27.7 C
Latur
Thursday, February 2, 2023
Homeपरभणीगद्दारांचे सरकार लवकरच कोसळेल : आ. वायकर

गद्दारांचे सरकार लवकरच कोसळेल : आ. वायकर

एकमत ऑनलाईन

पूर्णा : गद्दारांचे सरकार लवकरच खालसा होणार आहे. त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागावे. आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवावा असे आवाहन शिवसेनेचे परभणी जिल्हा संपर्क प्रमुख आ. रविंद्र वायकर यांनी केले आहे.

पूर्णा शहरातील जुना मोंढा परिसरातील राजारामबापू सभागृहात झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना आÞवायकर बोलत होतेÞ यावेळी डॉÞविवेक नावंदर, राजू कापसे, जिल्हाप्रमुख विशाल कदम, मारोती बनसोडे (पैलवान), माजी जिल्हाप्रमुख सुधाकर खराटे, संतोष एकलारे, शहरप्रमुख मुंजाभाऊ कदम, माजी शहरप्रमुख बंटि कदम, शाम कदम, ऍड.राज भालेराव, गंगाप्रसाद आणेराव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्याला शिवसेनेच्या पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होतीÞ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड. राज भालेराव यांनी तर आभार शहरप्रमुख मुंजाभाऊ कदम यांनी मानले.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या