27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeपरभणीअमरनाथ यात्रेसाठी गेलेला जत्था सुखरूप परतला

अमरनाथ यात्रेसाठी गेलेला जत्था सुखरूप परतला

एकमत ऑनलाईन

परभणी : सध्या अमरनाथ यात्रेच्यास्थळी ढगफुटी होऊन मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्याने भाविकांसह त्यांच्या नातेवाईकांमध्ये काळजीचे वातावरण आहे. परभणीतून अत्यंत कठीण अशा अमरनाथ यात्रेसाठी गेलेला ३९ भाविकांचा पहिला जत्था शनिवार दि. ९ जुलै रोजी सुखरूप परतला आहे.

परभणी रेल्वे स्थानकावरून अमरनाथ यात्रेसाठी पहिला जत्था २४ जून रोजी रवाना झाला होता. यामध्ये एकूण ३९ भाविकांचा समावेश होता. हे भाविक पूर्णा रेल्वे स्टेशनवरून जम्मूतवी एक्स्प्रेसने जम्मू येथे पोहचले. पुढे श्रीनगर येथील बालटालपासून ३ जुलै रोजी या यात्रेकरूंची पायीयात्रा सुरु झाली होती. अतिशय कठीण अशा डोंगर, द-या असलेला १५ किलोमीटरचा रस्ता पार करून बाबा बर्फानी तथा अमरनाथ भगवानच्या गुहे जवळ पोहचले.

कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात ठिकठिकाणी असलेल्या कॅम्पमध्ये या भाविकांना ठेवल्या जात होते असा अनुभव यात्रेकरू आनंद भगत व आशिष सोन्नेकर यांनी सांगितला. यावर्षी भाविकांना नैसर्गिक कोपामुळे ही यात्रा धोकादायक बनली आहे. शुक्रवार दि. ८ जुलै रोजी अमरनाथ भगवान अमरनाथ यांच्या गुहे जवळच ढगफुटी होऊन मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्याने काही भाविक मृत्युमुखी पडले तर अनेक भाविक बेपत्ता झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर परभणीतून गेलेल्या भाविकांचा जत्था शुक्रवारी सचखंड एक्स्प्रेसने सुखरूप परतल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. परतलेल्या यात्रेकरूंमध्ये आनंद भगत, प्रसाद भाग्यवंत, नागेश फुलारी, रेशमा भगत, श्रद्धा भगत, कल्पना खलसे, प्रतिभा ओपळे, योगिता फुलारी, आशिष सोन्नेकर, रोहिणी सोन्नेकर, किरवले आदींसह ३९ भाविकांचा समावेश होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या