24.3 C
Latur
Thursday, June 24, 2021
Homeपरभणीमहानिर्मितीच्या येलदरी जलविद्युत प्रकल्पातून बावन्न वर्षातील सर्वोच्च वीजनिर्मिती

महानिर्मितीच्या येलदरी जलविद्युत प्रकल्पातून बावन्न वर्षातील सर्वोच्च वीजनिर्मिती

एकमत ऑनलाईन

महाराष्ट्र राज्यातीलव वीज ग्राहकांना खात्रीशीर व किफायतशीर वीज पुरवठा करण्यामध्ये महानिर्मिती महत्त्वाचे योगदान देत आहे . महानिर्मितीचा येलदरी येथे २२.५ मेगावॅट स्थापित क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प असून या प्रकल्पातून प्रकल्प उभारणी नंतर प्रथमच१ एप्रिल ते २१ ऑक्टोबर या कालावधी मध्ये ४६.१४ दशलक्ष युनिट इतकी उच्चांकी वीज निर्मिती करण्यात आली आहे . संपूर्ण वर्षाकरिता ४१.०४४ दशलक्ष युनिट इतके वीज निर्मितीचे उद्दिष्ट असताना त्याहूनही जास्त वीज निर्मिती करत प्रकल्पाने ५२ वर्षातील सर्वोच्च कामगिरी करत विक्रमी वीज निर्मिती करण्यात यश प्राप्त केले आहे.

विशेष म्हणजे यातील३६.०२६ दशलक्ष युनिट इतकी वीज धरणातुन सोडून देण्यात येणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा वापर करून करण्यात आली आहे . मागील ५२ वर्षातील वीज निर्मितीच्या या सर्वोच्च कामगिरीबाबत येलदरी जल विद्युत प्रकल्प येथील अभियंता व कर्मचारी यांचे महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री ना. मा. डॉ . नितीन राऊत तसेच महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे ( भा.प्र.से.) व महानिर्मितीच्या वरिष्ठ व्यवस्थापन यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

यंदाही गाळपास आलेल्या ऊसाला योग्य तो भाव देऊ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या