27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeपरभणीदेवला गावात एक महिन्यापासून अंधाराचे साम्राज्य

देवला गावात एक महिन्यापासून अंधाराचे साम्राज्य

एकमत ऑनलाईन

सेलू : शहराजवळ पुनर्वसन झालेल्या देवला गावात एक महिन्यापासुन विज पुरठा खंडीत आहे. यामुळे अनेक गैरसोयीचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे. येथील विजपुरठा तात्काळ सुरुळीत करावा अशी मागणी येथील महिलांनी बुधवारी येथील महावितरण कार्यालयातील वरीष्ठ अधिका-यांकडे केली आहे.

सेलू शहराजवळील पुनर्वसन झालेल्या देवला गावातील विद्युत पुरवठा एक महिन्यापासून बंद आहे. महावितरणच्या अधिका-यांना वारंवार सांगितले पण याचा काही उपयोग झाला नाही. या भागात राहणारे सर्व नागरीकांना विजेअभावी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

विशेष करून शाळेतील मुलांना अभ्यासात व्यत्यय येत आहे. पिठाची गिरणी बंद तसेच अन्य व्यवसायावरही परिणाम झाला असून दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे़ त्यामुळे देवला गावातील हा विजपुरठा तातडीने सुरूळीत करावा अन्यथा या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी निवेदनातून दिला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या