23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeपरभणीमॉर्निंग वॉकला गेल्या चार जणांना अज्ञात वाहनाने चिरडले

मॉर्निंग वॉकला गेल्या चार जणांना अज्ञात वाहनाने चिरडले

दोन जणांचा जागीच मृत्यू तर दोन जण गंभीर

एकमत ऑनलाईन

मानवत : तालुक्यातील केकरजवळा येथे पाथरी पोखर्णी रस्त्यावर १२ सप्टेंबर रोजी पहाटे ४:१५ वाजता मॉर्निंग वॉकला गेलेल्या चार जणांना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन जण जागीच ठार झाले आहेत तर दोन जण गंभीर जखमी झाले त्याला उपचारासाठी परभणी येथे हलविण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच मानवत पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.

तालुक्यातील केकर जवळा येथील उत्तमराव नामदेव लाडाने वय ५२ आत्माराम भीमराव लाडाने वय ४२ हे या अपघातात ठार जागीच ठार झाले आहेत. तर नंदकिशोर साहेबराव लाडाने वय ५० राधेश्याम रामभाऊ लाडाने वय ४८ ते दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना परभणी येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच पो नि सुभाष राठोड कर्मचाऱ्यांसह घटना स्थली दाखल झाले आहेत.

आयपीएल स्पर्धेच्या दुस-या टप्प्याअगोदर ३ संघांना धक्का

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या