23.2 C
Latur
Wednesday, June 16, 2021
Homeपरभणीपरभणी जिल्ह्यात १ जूनपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार

परभणी जिल्ह्यात १ जूनपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार

एकमत ऑनलाईन

परभणी : कोरोनाचा वाढता संसर्ग अटोक्यात आणण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाऊन कालावधीत वाढ केली आहे. राज्य सरकारच्या नवीन आदेशानुसार आता लॉकडाऊन १ जूनपर्यंत राहणार आहे. या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव अटोक्यात आणण्यासाठी संचारबंदी १ जूनपर्यंत वाढवण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी काढले आहेत. संचारबंदी आदेशातून दररोज सकाळी ७ ते ११ या वेळेत किराणा, भाजीपाला व फळ विक्रीस परवानगी दिली असल्याचे या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांना थोड्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन कालावधीत १५ मे पासून दि.१ जून पर्यंत वाढ केली आहे. जिल्ह्यातील किराणा, भाजीपाला व फळ विक्रीस सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुट बहाल करण्यात आली आहे. मात्र इतर सर्व दुकाने व आस्थापना पुढील आदेश येईपर्यंत बंद राहतील, असे जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी आदेशात म्हटले आहे. बँकामधील बीसी व सीएसपी सेवा व ग्राहकांसाठी सेवा नेहमीच्या वेळेप्रमाणे सुरू राहिल. कृषीतंर्गत सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील. तसेच घरपोच पिण्याचे पाणी, लसीकरण किंवा अत्यावश्यक सेवा देखील सुरू राहणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. दरम्यान संचारबंदीच्या पार्श्वभुमीवर सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

मराठवाड्यातील बहुजनांचा आवाज काळाच्या पडद्याआड

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या