22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeपरभणीनिम्न दुधनाची रखडलेली कामे पाच जूनपर्यंत पूर्ण होणार

निम्न दुधनाची रखडलेली कामे पाच जूनपर्यंत पूर्ण होणार

एकमत ऑनलाईन

परभणी : निम्न दुधना प्रकल्पांतर्गत येणा-या मटक-हाळा व वाडी दमई येथील कामे ०५ जूनपर्यंत पूर्ण केली जातील असे आश्वासन माजलगाव कालवा क्रमांक १० चे कार्यकारी अभियंता श्री. प्रसाद लांब यांनी दिले आहे. राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्या संकल्पनेतून जलसंपदा विभाग शेतक-यांच्या बांधावर हा अभिनव उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविला जात आहे.

याच उपक्रमांतर्गत माजलगाव कालवा क्रमांक १०चे कार्यकारी अभियंता श्री.प्रसाद लांब व प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिका-यांनी निम्न दुधनाच्या मटक-हाळा व वाडी दमई येथील कामांची पाहणी केली. कालव्यांची व शेतचा-यांची देखभाल दुरुस्ती तसेच कालवा लगतचे रस्ते दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणावर होत असल्याने या परिसरातील मटक-हाळा, संबर, सावंगी खुर्द, साडेगाव, वाडी दमई, झरी, बोबडे टाकळी व पिंगळी कोथळा या गावातील शेतजमिनी बारमाही सिंचनाखाली येणार असल्याने परिसरातील शेतक-यांनी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू, कार्यकारी अभियंता श्री.प्रसाद लांब व प्रहार जनशक्ती पक्ष परभणीच्या पदाधिका-यांचे आभार मानले आहेत.

या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, गजानन चोपडे, वैभव संघई, मटक-हाळा शाखा प्रमुख उद्धव गरुड, माउली गरूड, संदीप राऊत, दत्तराव राऊत, किशनराव गरूड, बालासाहेब तरवटे, आत्माराम गरूड, कृष्णा गरूड, हनुमान गरूड, विठल गरूड, राजेश हरकळ, रामा गरूड इत्यादी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या