22.8 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeपरभणीमहाविकास आघाडी सरकार कराद्वारे लूट करण्यात एक नंबरवर

महाविकास आघाडी सरकार कराद्वारे लूट करण्यात एक नंबरवर

एकमत ऑनलाईन

परभणी (प्रतिनिधी) : जनतेच्या हिताच्या योजना आखून त्या अंमलात आणण्यात महाराष्ट्रातील आघाडी सरकार सपशेल अपयशी ठरले असून, पेट्रोल-डिझेलवरील कर कपात केल्याचा गवगवा करून फसवणुकीचा नवा पायंडा पाडणारे ठाकरे सरकार कराद्वारे लूट करणारे देशातील पहिल्या क्रमांकाचे सरकार ठरले आहे, अशी टीका भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी केली.

जनतेच्या खिशातून हजारो कोटींची लूट केल्यानंतर आता पेट्रोल, डिझेलवरील मूल्यवर्धित करामध्ये (व्हॅट) अनुक्रमे २.०८ रुपये व १.४४ रुपय कपातीचा पोकळ गाजावाजा करून ठाकरे सरकारने पुन्हा जनतेच्या डोळ्यात धुळफेक केली आहे. जनतेला दिलासा देण्याऐवजी केंद्राविरुद्धच्या राजकारणात जनतेला वेठीस धरण्याचा ठाकरे सरकारचा डाव उघड झाला असून राज्याच्या करामध्ये ५० टक्के कपात करून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी बोर्डीकर यांनी केली. केंद्र सरकारचा इंधनावरील कर केवळ १९ रुपये असताना ठाकरे सरकार मात्र ३० रुपये कर आकारून जनतेचा खिसा ओरबाडत तिजोरी भरत आहे त्यामुळे राज्यातील पेट्रोल डिझेल दरवाढीस राज्य सरकारच जबाबदार आहे, अस आरोपही त्यांनी केला.

केंद्र सरकारने गेल्या सहा महिन्यांत दुस-यांदा पेट्रोल-डिझेलवरील अबकारी करात कपात केली. राज्य सरकारने मात्र एका पैशाचीही कपात न करता केंद्र सरकारने केलेल्या कर कपातीचे श्रेय घेण्याचा फसवा प्रयत्न करून जनतेची दिशाभूल केली. आता राज्य सरकारचे पितळ उघडे पडले आहे, असे त्या म्हणाल्या. महाराष्ट्रात पेट्रोलवर लिटरमागे ३२.५५ रुपये तर डिझेलवर लिटरमागे २२.३७ रुपये एवढा कर राज्य सरकार आकारते, असेही त्यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या