30.8 C
Latur
Monday, January 18, 2021
Home परभणी परभणीच्या गिर्यारोहकांनी सर केला हिमालयातील हरकीदून पर्वत

परभणीच्या गिर्यारोहकांनी सर केला हिमालयातील हरकीदून पर्वत

एकमत ऑनलाईन

परभणी : उत्तराखंड राज्यात प्रसिद्ध असलेला हरकीदून हा गिर्यारोहकांचा आवडता दुर्गम पर्वत आहे. हौशी व धाडसी गिर्यारोहक समुद्रसपाटीपासून १४००० फुट उंचीवर असलेला हा पर्वत सर करण्यासाठी आवडीने निवड करतात. परभणीचे हौशी गियार्रोहक, सामजिक कार्यकर्ते सर्पमित्र रणजित कारेगांवकर व विष्णू मेहत्रे यांनी हा पर्वत अनुभवी गिर्यारोहक हर्षादित्य बिजापूरी यांच्या नेतृत्वाखाली व सौरभ सेमवाल यांच्या सहकार्याने आणि रामलाल गाईडच्या दिशादर्शनानुसार दि.२० ते २२ नोव्हेंबर या तीन दिवसात सर केला.

देहरादून शहरापासून २५० किमी दूर असणा-या सांकरी गावातून तालुका या गावी पोहचल्यानंतर तेथून १५ ते ३० किलो वजनाची एक बॅग घेऊन हे अंतर पायी पार केले. सुरूवातीलाच मोहिम प्रमुख हर्षादित्य बिजापुरी यांनी एकत्र चालण्याचे आवाहन केले. वाटेत राहण्यायोग्य जागा बघून निसर्गाच्या सान्निध्यात भोजन तयार करून त्याचा सर्वांनी आनंद घेतला. नैसर्गिक धबधबे, झरे, झाडे, बर्फ, पक्षी, डोंगर, द-या, चांदणीरात्र व सुपीन नदीचा खळखळाट यांचा मनसोक्त आनंद घेत व उने १० सेल्सिअस तापमानाच्या थंडीत एकमेकाला धीर देत रात्र काढत हे गिर्यारोहन तीन दिवसात पुर्ण केले. परतीच्या वेळी सकाळी सौरभ सेमवाल हे नजरचुकीने निसरड्या बर्फावरून पाय घसरून जोरात पडल्याने मुका मार लागला. त्यांना चालणेही अवघड झाले. सर्वांनी त्यांना धीर दिला.

मोहीमप्रमुख हर्षादित्य यांनी त्यांना सावरत त्यांची अवजड बॅग व स्वत:चीही बॅग घेऊन ती त्या निसरड्या वाटेच्या पर्वताखाली नेऊन ठेवली. नंतर परत येऊन सौरभ यांना आधार देत दहा किमी पर्यंत घेऊन गेले. एके ठिकाणी त्यांना झोपवून त्यांची स्ट्रेचींग करून आराम दिला व चालण्यायोग्य केले. निसरड्या वाटेत श्वासावर लक्ष ठेवून एकाग्रतेने चालणे हेही एक प्रकारचे मेडिटेशनच असते असे बिजापूरी यांनी सांगितले. वाटेत महीला गिर्यारोहक गाईड म्हणून कार्य करत असलेली परिता राणा यांचा परिचय करून देत त्यांच्या धाडसी स्वभावाची ओळख करून दिली.

परभणीचे कारेगांवकर व मेहत्रे यांचा हिमालय पर्वतरांगातील गिर्यारोहनचा पहिलाच अनुभव होता. या पर्यटन प्रवासातून खुप काही शिकायला मिळाले, असे मत त्यांनी व्यक्त केले. हरकीदून हा गोविंद राष्ट्रीय उद्यान अंतर्गत येणारा हिमालय पर्वतरांगांतील एक निसर्गरम्य पर्वत असून सुपीन नदीचा इथे उगम होतो. या पर्वताच्या बाजूला स्वर्गरोहीणी, श्रीखंड व जोंधरा आदी बर्फांनी वेढलेल्या सुंदर पर्वत रांगांचे दर्शन होते. येथे जाण्यासाठी देहरादून वरून बसने किंवा कारने सांकरी मार्गे तालूका गावातून जाऊ शकतो. मार्च ते मे खुप हरित व फुलापानांनी वेढलेला परिसर असतो. यावेळी हौशी गियार्रोहक व पर्यटकांची गर्दी असते. वनविभागाकडून परवानगी घेऊन गिर्यारोहनास जावे लागते. देहरादून येथे पोहचताच यशस्वी गिर्यारोहन केल्याबद्दल डॉ. हरिनी बिजापूरी, डॉ.आफरीन व डॉ.सत्यगांधी यांनी पुष्पगुच्छ देत औक्षण करून या गिर्यारोहकांचे स्वागत केले.

उद्यापासून तीन हजार भाविकांना घेता येणार श्री विठ्ठलाचे दर्शन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या