24 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeपरभणीजिंतूर शहराला जत्रेचे स्वरूप; वाहनांची एकच वर्दळ

जिंतूर शहराला जत्रेचे स्वरूप; वाहनांची एकच वर्दळ

एकमत ऑनलाईन

जिंतूर : शहरातील शिवाजी चौक,मेन चौक, बाजार समिती चौक, येलदरी रोड,सर्व बॅके समोर,प्रत्येक बाजारपेठेतील दुकाना समोर, खाजगी रुग्णालया समोर, पोलिस ठाणे समोर, भाजी मंडईत, अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळील चौक, परिसरातील हॉटेल समोर व तहसील कार्यालयाचा गेट बंद केल्यामुळे तहसील गेट समोरील सार्वजनिक रस्त्यावर दुचाकीस्वारांची वाहने लावल्यामुळे या रस्त्यावर पदचारी व वाहतुकीसाठी कोंडी निर्माण झाली होती.

पोलीस प्रशासनाचा एकही कमर्चारी दिवसभर या भागात फिरकत नसल्यामुळे अनेक वाहनधारकांचा वाहनांचे एकमेकाला धक्का लागला कि एकमेकाविरुद्ध शाब्दीक खटके उडत असल्याचे दिसून येत आहे.एका तर संचारबंदीत सुट दिल्यामुळे शहरातील बाजार पेठ व रस्त्यावर न.प. कमर्चारी व अधिकारी फिरकत नसल्यामुळे बिनधास्तपणे विना मास्क फिरणाºया नागरिकांमुळे जत्रेचे स्वरुप आले आहे त्यामुळे कोरोनाचा धोका देखील वाढला आहे.त्यामुळे सर्व प्रशासनाने आपले कमर्चारी दिवसभर तैनात करून शहराची सुरक्षा कायम ठेवावी अशी मागणी सूजान नागरिकांतून होत आहे.

जिंतूर शहरात एक महिला कोरोना पॉझिटिव्ह
जिंतूर शहरातील मध्यवस्तीत असलेल्या टिपू सुलतान चौक परिसरातील एका वृद्ध महिलेला उपचारासाठी परभणी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असता या महिलेची परभणी रुग्णालयात कोरोना रॅपिड टेस्ट घेण्यात आली असता सदर महिला कोरोना पॉझिटिव असल्याचे मंगळवारी दि २१ जुलै रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आल्याने जिंतूर शहरात एकच खळबळ माजली असून सदर महिलेच्या संपर्कातील जवळपास ११ लोकांना कोरोनटाईण करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी रविकिरण चांडगे यांनी दिली आहे.

Read More  स्वाभिमानीचे दूध आंदोलन पेटले हजारो लिटर दूध रस्त्यावर

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या