30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeपरभणीरूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले

रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले

एकमत ऑनलाईन

परभणी (प्रवीण चौधरी ): जिल्ह्यात काही दिवसापुर्वी दिवसेंदिवस रूग्ण संख्या वाढत असल्याने परभणीकरांची चिंता वाढली असतांनाच आता कोविडचे रूग्ण बरे होण्याचे प्रमाण लक्षणीय वाढल्याने परभणीकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या सहा ते सात महिन्यापासून परभणी जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत जात असल्याने परभणीकरांची चिंता वाढली होती. रूग्ण संख्या वाढत असतांनाही प्रशासन मात्र खबरदारीचे उपाय म्हणून जिल्ह्यात सर्वत्र यंत्रणा सज्ज केली होती.

सुरूवातीला ग्रामीण भागातील रूग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने यावर ब-याच प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. तर शहरी भागातही संख्या लक्षणीय वाढली होती. यामुळे जिल्ह्यात दररोज ७० ते ८० रूग्ण सापडत असतांनाच सोमवारी प्रशासनाद्वारे आलेल्या अहवालात मात्र केवळ २५ रूग्ण आढळून आल्याने परभणीकरांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. सध्या जिल्हा रूग्णालयात ४९० रूग्ण उपचार घेत आहेत.

जिल्हा प्रशासनाने वाढती रूग्ण संख्या लक्षात घेता मोठ्या प्रमाणात बेडची व्यवस्थाही केली आहे. माझे कुटूंब माझी जबाबदारी या अंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनीही यास मोठा प्रतिसाद दिल्याने आता रूग्ण संख्येला आळा बसविण्यात यश येत आहे. मंगळवारी रात्री उशीराने आलेल्या जिल्हा प्रशासनाच्या अहवालात ३८ नव्याने रूग्ण वाढले असले तरी उपचारानंतर बरे झालेले ९१ रूग्ण घरी गेले आहेत. सध्या रूग्णालयात ४३७ रूग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत जिल्हाभरात ६ हजार १३२ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले असून ५ हजार ४४२ रूग्ण उपचारानंतर घरी गेले आहेत.

परभणी शहरात मंगळवारी एकही रूग्ण नाही
परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील ४ केंद्र व ७ खासगी रूग्णालयात ८६ नागरिकांची रॅपीडअ‍ॅन्टीजन टेस्टद्वारे तपासणी करण्यात आली असून यात एकही रूग्ण आढळून आला नसल्याने ही परभणीकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. शहरातील जायकवाडी येथील मनपा रुग्णालयात ११, सिटी क्लब ८, खंडोबा बाजार आरोग्य केंद्रात ४, इनायतनगर आरोग्य केंद्रात ४३ तर खासगी रुग्णालयात २० व्यक्तींची रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्टद्वारे तपासणी करण्यात आली.

देशात लवकरच होणार वाहन, मोबाईलमधील बॅटरीची निर्मिती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या