27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeपरभणीशेतक-यास पूर्वसूचना न देता रातोरात शेतातून काढला पांदण रस्‍ता

शेतक-यास पूर्वसूचना न देता रातोरात शेतातून काढला पांदण रस्‍ता

एकमत ऑनलाईन

कौसडी : सेलू तालुक्यातील हट्टा येथील शेतकरी शेषराव चंद्रभान लगड यांच्या शेतातून गावातील काही जणांनी संगनमत करून कसल्याही प्रकारची पूर्व सूचना न देता शेतातून रातोरात रस्ता तयार केला आहे. या प्रकरणी रस्ता तयार करणा-या जेसीबी चालक, गावातील पोलीस पाटील यांच्यासह दोन जणांविरुद्ध बोरी पोलीस ठाण्यात शुक्रवार, दि़१७ जून रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सेलू तालुक्यातील हट्टा येथील शेतकरी शेषेराव चंद्रभान लगड यांनी बोरी पोलिसात दिलेल्या फियार्दीत म्हटले की, गट नंबर १२० मध्ये गावातील पोलीस पाटील भानू ईक्कर, प्रभू ईक्कर, ज्ञानेश्वर इक्कर, जेसीबी चालक संतोष सोनवणे राहणार वालूर यांनी संगनमत करून कसल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता रातोरात माझ्या मालकी हक्कातील शेतातून रस्ता तयार केला आहे. यामध्ये शेतीचे मोठे नुकसान झाले असून संबंधितांना विचारणा केली असता त्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार शेतकरी लगड यांनी बोरी पोलिसात दिली आहे. या तक्रारीवरून हट्टा येथील पोलीस पाटील भानू ईक्कर, प्रभू ईक्कर, ज्ञानेश्वर उर्फ माऊली ईक्कर, जेसीबी चालक, संतोष सोनवणे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत मुळे करत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या