31 C
Latur
Thursday, January 21, 2021
Home परभणी परभणीत महामंडळ बसेसवर चिटकवल्या संभाजीनगरच्या पाट्या

परभणीत महामंडळ बसेसवर चिटकवल्या संभाजीनगरच्या पाट्या

एकमत ऑनलाईन

परभणी : औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामांतरण करण्याच्या मागणीसाठी भाजपा कामगार आघाडी मंगळवारी आक्रमक झाली. या पार्श्वभुमीवर परभणी शहरातील बसस्थानकावर जावून महामंडळाच्या बसेसवर औरंगाबाद नव्हे केवळ छत्रपती संभाजी नगर अशा आशयाच्या पाट्या लावण्यात आल्या. या वेळी छत्रपती संभाजी महाराज की जय, भाजपा कामगार आघाडीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. छत्रपतींचे राज्य म्हणजे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय देणारे राज्य होते. परंतु दुर्देवाने या मराठी मुलुखात परकीय मुगल आक्रंता असलेल्या औरंगजेबच्या नावे औरंगाबाद हे शहर वसविले गेले.

महाराष्ट्राच्या जमिनीवरील हे नाव तात्काळ काढले पाहिजे अशी मागणी तमाम शिवभक्तांची आहे, असे सांगत भाजपा कामगार आघाडीतर्फे औरंगाबाद नव्हे केवळ संभाजीनगर अश्या आशयाचे फलक राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस वर लावण्यात आले. या वेळी भाजपा सरचिटणीस दिनेश नरवाडकर, संजय रिझवाणी, भाजपा कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष रोहित जगदाळे, संतोष जाधव, कामगार आघाडी सरचिटणीस मनोज देशमुख, शुभम शास्त्री, अभिजित मंगरूळकर, निरज बुचाले, विठ्ल बेनशेळकीकर, सुनील ढसाळकर, गणेश कोपे, माऊली कोपरे, रोहन बागल आदी भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रजासत्ताकदिनी गलवान शहीदांचा गौरव

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,414FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या