22.9 C
Latur
Wednesday, July 28, 2021
Homeपरभणीमानवत शहरात बेशिस्त वाहतुकीमुळे रहदारीचा प्रश्न गंभीर

मानवत शहरात बेशिस्त वाहतुकीमुळे रहदारीचा प्रश्न गंभीर

एकमत ऑनलाईन

मानवत : मानवत बाजारपेठेतील सर्व आस्थापणा उघडण्याची परवानगी दिल्यानंतर शहरात बेशिस्त वाहतुकीमुळे रहदारीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासनाने बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त इतर आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता कोरोनाचे संक्रमन कमी होत असल्याने पुन्हा बाजारपेठ सकाळी ७ ते २ पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शहरातील सर्वच आस्थापना आजपासुन सुरू झाल्या आहेत.

त्या मूळे नियमाचे पालन करून व्यापारी बांधवांनी आपली आस्थापणे उघडली आहे. पण आज शहरात मुख्य मार्गावर मोठी वर्दळ व गर्दी पाहावयास मिळाली आहे. शहरातील गर्दीमूळे दुचाकी देखील चालवता येत नव्हते. आजही शहरातील विविध दुकानासमोर माल घेण्यासाठी व घेऊन जाण्यासाठी आलेली वाहने भर रस्त्यात उभी केली जात असल्यामूळे रहदारीचा प्रश्न निर्माण होत आहे. मानवत शहरातील मंत्री गल्लीतील चौकातील एका कृषी केंद्रासमोर वाहने उभी केल्यामुळे स्टेट बँके पर्यंत वाहनांची रांग लागली होती.

त्यामूळे रहदारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. वेळो वेळी पोलीस प्रशासनाने अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. तरीही वाहतुकीचा प्रश्न बहुतांशी सुटेलेला नाही. शहरात कोरोना कोविड १९ या महामारी संसर्ग जन्य आजाराचे सर्व नियम पाळून नागरीकांनी आपली व आपल्या कूंटूंबाचे रक्षण करावे असे मत जानकार नागरीकांतून व्यक्त केल्या जात आहे.

औषधांच्या अवैध साठेबाजीत गौतम गंभीर दोषी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या