24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeपरभणीपाच गावांत चार महिन्यांपासून अंधाराचे साम्राज्य

पाच गावांत चार महिन्यांपासून अंधाराचे साम्राज्य

एकमत ऑनलाईन

जिंतूर : जिंतूर तालुक्यातील आंडगाव बाजार महावितरण सब स्टेशन हद्दीतील श्रीरामवाडी, टाकळखोपा, कामटा, सोरजा, भुसकवडी या पाच गावात मागील चार महिन्यांपासून विजेअभावी अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. विजेअभावी नागरीकांना विविध समस्येचा सामना करावा लागत आहे. या विरोधात सरपंच भानुदास घुगेसह पाच गावांतील जवळपास ६० ग्रामस्थ शहरातील महावितरण अभियंता मेश्राम यांच्या दालनात शनिवार, दि. २७ ऑगस्ट रोजी धडकले. यावेळी नागरिकांनी मागील चार महिन्यांपासून विजेअभावी होणा-या समस्येचा पाडाच वाचला. यावेळी अभियंता मेश्राम यांनी विज सुुरळीत करण्याचे आश्वासन दिल्याने ग्रामस्थ निवेदन देऊन परत गेले.

जिंतूर तालुक्यातील आंडगाव बाजार महावितरण सब स्टेशन हद्दीतील श्रीरामवाडी, टाकळखोपा, कामटा, सोरजा, भुसकवडी या गावात मागील चार महिन्यांपासून विज वितरणाचा एकही अभियंता, कर्मचारी फिरकलेला नाही. नागरिकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन देखील उचलत नाही. परिणामी गावात विज नसल्याने गावे अंधारात आहेत. वीज नसल्यामुळे पिण्याच्या पाणी समस्या, मुलांचे शिक्षण, शेत पिकाला पाणी मिळत नसल्याने पीके उध्वस्त होत आहेत. यासह इतर विविध समस्या भेडसावत आहेत.

त्यामुळे गावात थ्री फेस विज महावितरण जो पर्यंत चालू करत नाही तोपर्यंत दालन सोडणार नाही असा पवित्रा सरपंच व ग्रामस्थांनी घेतला होता. अभियंता मेश्राम यांनी ग्रामस्थांशी संवाद साधूून स्थानिक महावितरण कार्यालयात कर्मचारी संख्या कमी असल्याचे सांगितले. तसेच आंडगाव सर्कलमध्ये ज्या समस्या आहेत त्या मी त्वरित सोडविण्याचा प्रयत्न करेल असे ग्रामस्थांना सांगितले. यावेळी सरपंच भानुदास घुगे, गुलाब पवार, नारायण श्रीरामे, मारोती दळवे, पिराजी आंनदे, गजानन श्रीरामे, दीपक ठोंबरे यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षरीचे निवेदन अभियंता मेश्राम यांना देण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या