23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeपरभणीमुख्य पुतळ्याचे काम सुरू करण्यासाठी प्रतिकृती अंतिम होणे आवश्यक - धनंजय मुंडे

मुख्य पुतळ्याचे काम सुरू करण्यासाठी प्रतिकृती अंतिम होणे आवश्यक – धनंजय मुंडे

एकमत ऑनलाईन

परभणी : मुंबईतील इंदूमिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकस्थळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य ३५० फुटी पुतळा बसवण्यात येणार असून या पुतळ्याची प्रतिकृती उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील प्रसिद्ध आर्टिस्ट पद्मभूषण राम सुतार यांच्या फाईन आर्टस या ठिकाणी सुरू आहे. या ठिकाणी पुतळ्याची २२ फुटी प्रतिकृती तयार करण्यात आली असून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांसह राज्य शासनाच्या समितीने गाझियाबाद येथे भेट देऊन या कामाची शुक्रवार दि. २० मेरोजी पाहणी केली.

मुंबईतील इंदूमिल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य अंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यात येत असून, याचे काम जरी एम एम एम आर डी ए कडे असले, तरी त्याच्या सनियंत्रणाची जबाबदारी सामाजिक न्याय विभागाने घेतलेली आहे. राज्य सरकारने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती नेमली असून, या समितीमध्ये नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचाही समावेश आहे. स्मारक स्थळी उभारण्यात येणार असलेला पुतळा अंतिम करण्याची जबाबदारी देखील या समितीकडे असल्याने आज गाझियाबाद येथे या समितीने भेट देऊन पुतळ्याच्या प्रतिकृतीची पाहणी केली.
सदर २५ फुटी प्रतिकृती तयार करताना एम एम आर डी ए ने काही बदल त्यामध्ये पूर्वी सुचवले होते. ते बदल करून राम सुतार यांनी २५ फुटी प्रतिकृती साकारली आहे. पद्मभूषण राम सुतार यांनी सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या स्मारकासह अनेक पुतळ्याचे काम यापूर्वी केलेले आहे.

सदर प्रतिकृतीची पाहणी करताना धनंजय मुंडे यांसह समितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शरीर यष्टीप्रमाणे पाय, पोट, डोके आदी रचना हुबेहूब असाव्यात याबाबत आणखी काही बदल आज सुचवले आहेत. हे बदल पूर्ण करून त्यास एमएमआरडीए व राज्य शासनाच्या समितीची मान्यता घेतल्यानंतर मुख्य पुतळ्याचे काम हाती घेता येणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या