22.1 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeपरभणीआरटीओ वाहन निरीक्षकाची गाडी दिली पेटवून

आरटीओ वाहन निरीक्षकाची गाडी दिली पेटवून

एकमत ऑनलाईन

परभणी : शहरातील ममता कॉलनीत रहिवासी असलेल्या आरटीओ कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक अभिजीत तरकसे यांची घरासमोर लावलेली चारचाकी कार अज्ञात व्यक्तीने बुधवार दि. २० जुलै रोजी रात्री उशीराच्या सुमारास पेटवून दिल्याची घटना घडली आहे. या घटनेत कार पूर्णत: जळून खाक झाली आहे. या प्रकरणी तरकसे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरा नवा मोंढा पोलिसांत सुरू होती.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, शहरातील ममता कॉलनीत आरटीओ कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक अभिजीत तरकसे वास्तव्यास आहेत़ त्यांनी मेव्हनाच्या नावे असलेली हुंदाईची आय १० कार क्रमांक एमएच ४२ एएस ७०७७ बुधवारी रात्रीच्या सुमारास घराबाहेर लावली होती. मध्यरात्री तरकसे यांना मोठा आवाज ऐकू आला.

त्यानंतर त्यांनी घराबाहेर येवून पाहिले असता आपली कार जळत असल्याचे त्यांना दिसून आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ धाव घेत कारची आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतू तोपर्यंत कार पूर्णत: जळून खाक झाली होती. तरकसे यांनी पुणे येथील त्यांच्या मेव्हण्याकडून ही कार वापरण्यासाठी आणली असल्याचे समजते. या प्रकरणी तरकसे यांनी नवा मोंढा पोलिसांत गुरूवारी रात्री दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरूध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या