मानवत : शहरातील मुख्य बाजार पेठेतील काही भागात कंटेन्मेट झोन झाल्याने बहुतांश बाजार पेठ बंदच होती. परंतू सवलतीच्या नावाखाली सर्वच नियम धाब्यावर बसविण्यात आल्याने बॅकेत पैसे काढण्यासाठी नागरीकांनी तुफान गर्र्दी दिसून येत होती .त्यामूळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भिती निर्माण झाली आहे.
कोरोना कोविड मुक्त आसलेल्या मानवत शहरात बाहेर गावावरून आलेल्या नागरीकांतून कोरोनाचा प्रसारातुन रूग्णाचा संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने संपूर्ण मानवत शहर लाँक डाऊन करण्यात आले होते. पण संचार बंदीत शिथीलता देत जिल्हा प्रशासन यांनी नियम अटी देत सर्व दुकानदारांनी दुकानांतून सॅनेटायझरची व्यवस्था करावी,कॉऊटरसह अन्य फर्निचरचे सॅनेटायझरद्वारे निर्जंतुकीकरण करावे, सामाजिक अंतर राखण्या करीता उपाय योजना कराव्यात.
तसेच स्वत:सह नोकरदार वर्ग रोज मास्क वापरतील याची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर केले असून जे दुकानदार किंवा नागरीक या बाबतीत उदासीनता दाखवतील अशा व्यापार पेठेतील सर्व प्रतिष्ठानावर दुकानदारां च्या दुकानांना प्रशासनाद्वारे कायदेशीर दंडात्मक कारवाई किंवा वेळ प्रसंगी सील ठोकले जाईल असा ईशारा ही प्रशासनाच्या वतीने देण्यात आला होता पण आज मानवत शहरातील व्यापार पेठेतील बॅकांपूढे बहुतांशी सर्व नियमाची पायमल्ली केल्याचे स्पष्ट दिसुन येत होते.शहरातील बॅका पूढे पैसे काढण्यासाठी नागरिकांनी तुफान गर्दी केली. त्या मूळे बॅक समोर गर्दी वाढल्याने प्रशासनही हतबल झाल्याचे चित्र आज व्यापार पेठेतील बॅका पूढे स्पष्ट दिसत होते.
Read More लातूर जिल्हयात २५ ते ३१ जूलै दरम्यान लॉकडाऊन अधिक कडक