परभणी (प्रतिनिधी) : शहरातील मध्यवस्तीत असलेल्या कच्छी बाजारातील टिप टॉप या दुकानास शुक्रवारी (दि.२७) पहाटे चार वाजेच्या सुमारास आग लागली. आगीने लगेच रौद्ररुप धारण केले. प्रत्यक्षदर्शींनी अग्निशमन दलाला पाचारण केले. तीन तास प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आली. परभणी, गंगाखेड, पाथरी व मानवत येथील बंब यासाठी धावून आले होते. दरम्यान, या आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नाही़ परंतु, संबंधित दुकान मालकाचे मोठे नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.