24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeपरभणीमोटर सायकलने घेतला पेट नागरिकांच्या सावधानतेमुळे अनर्थ टळला

मोटर सायकलने घेतला पेट नागरिकांच्या सावधानतेमुळे अनर्थ टळला

एकमत ऑनलाईन

सेलू : शहरातील रेल्वे स्टेशन जवळ पेट्रोल पंपावर आज दुपारी साडेबाराच्या सुमारास एका व्यक्तीने पेट्रोल भरून गाडीला किक मारत असताना गाडीने अचानक पेट घेतल्याने तेथील कर्मचा-यांमध्ये एकच धावपळ उडाली. कर्मचा-यांच्या ही गंभीर बाब लक्षात येताच त्यांनी तेथून गाडीला प्रथम दूर नेले आणि नंतर त्या गाडीला विझवण्याचा प्रयत्न केला. या कर्मचा-यांच्या प्रसंगावधानामुळे पेट्रोल पंपावर होणारा मोठा अनर्थ टळला.

आज दुपारी साडेबाराच्या सुमारास दुचाकीस्वार आपल्या दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर आला असता आणि पेट्रोल भरून झाल्यानंतर गाडीचे प्लग लूज असल्याने गाडीची किक मारतात गाडीने पेट घेतला आणि गाडी जाळायला सुरुवात झाली.

गाडीला लागलेली आग बघून तेथील कमर्चारी यांनी धावपळ करून प्रथमत: गाडीला पेट्रोल पंपातून बाहेर नेले आणि दूर अंतरावर नेऊन त्याठिकाणी पाणी आणि अग्निशामक यंत्राच्या साह्याने गाणी विझवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पेट्रोल पंपावर काम करणारे कमर्चारी रामेश्वर वैद्य, महादेव जुमडे, आकाश लावले, आणि तुकाराम वैद्य यांनी प्रसंगावधान राखल्याने मोठी दु.र्घटना टळली असल्याचे दिसून येते.

स्पॉन्सरशिपसाठी बीसीसीआयने मागवले अर्ज

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या