28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeपरभणीगोडाऊन फोडून सोयाबीनसह अडीच लाखाची चोरी

गोडाऊन फोडून सोयाबीनसह अडीच लाखाची चोरी

एकमत ऑनलाईन

जिंतूर : शहरातील औेद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या गोडाऊन मधून अज्ञात आरोपीने सोयाबीनने भरलेल्या ९५ पोत्यांसह रोख १४ हजार रूपयांची रक्कम पळवली आहे. या घटनेत चोरट्यांनी २ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल लंपास केला़ या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मागील काही दिवसांपासून शहरातील पोलिसांच्या निष्क्रिय कामगिरीमुळे चो-यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. रात्री शहरासह औद्योगिक वसाहतीमध्ये गस्त असणे गरजेचे आहे. परिणामी चोरीच्या घटना घडणार नाहीत परंतू मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे़ अगोदर झालेल्या चो-यांमध्ये केवळ रोख रक्कम, दागदागिने चोरीस गेले आहेत. यातच चोरट्यानी आपला मोर्चा शेतमालावर वळवला असल्याचे स्पष्ट झाले आहे़ यात शहरातील नितीन घळे यांचा भुसार माल खरेदीचा व्यवसाय आहे.

त्यांनी खरेदी केलेले सोयाबीनचे ५७ पोते औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या गोडाऊनमध्ये साठवून ठेवले होते़ याच संधीचा फायदा घेऊन चोरट्यानी सोयाबीन भरलेल्या जवळपास ९५ पोत्यावर डल्ला मारला आहे. या सोयाबीनची किंमत २ लाख ३१ हजार व रोख १४ हजार रुपये लंपास केले आहेत. यावरून जिंतूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या