पूर्णा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने व्यापारी वर्गाला विश्वासात न घेताकिंवा त्यांच्याशी सल्लामसलत न करता अचानक केलेली भाडेवाढ अन्यायकारक आहे. या प्रकरणी दि.०५ मार्च रोजी गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या निवासस्थानी व्यापा-यांनी भेट घेतली. बाजार समितीचे सभापती बी.आर.देसाई व कृषी उत्पन्न समिती प्रशासनाने अन्यायकारक भाडेवाढ केल्यामुळे व्यापा-यांमध्ये तीव्र संताप होत असून आ.डॉ.गुट्टे यांची भेट घेऊन भाडेवाढ प्रश्नी स्वत: लक्ष घालण्याची विनंती केली. त्यावर मी स्वत: विशेष लक्ष घालून तोडगा काढण्यात येईल, असे सकारात्मक आश्वासन देऊन आलेल्या सर्व व्यापा-यांची विचारपूस केली. याप्रसंगी ज्येष्ठ आडत व्यापारी जब्बार थारा, आडत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.जयप्रकाश मोदानी यांच्या नेतृत्वाखाली आडत व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.