26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeपरभणीचिखलमय रस्त्याने घेतला युवकाचा बळी

चिखलमय रस्त्याने घेतला युवकाचा बळी

एकमत ऑनलाईन

परभणी : पाथरी तालुक्यातील वाघाळा गावातील पारधी वस्तीवरील एका तीस वर्षीय युवकास चिखलमय रस्त्यामुळे दवाखाण्यात उपचारासाठी नेण्यास उशीर झाल्यामुळे प्राण गमवावे लागल्याची घटना घडली आहे. वाघाळा गावापासून दोन- अडीच किमी अंतरावर पारधी समाज शेती कसण्यासाठी वास्तव्यास आहेत. पावसाळा सुरू झाला की या वसाहतीचा गावांशी संपर्क तुटतो.

वसाहतीत राहाणा-या राजेभाऊ रामा पवार या युवकाला सोमवारी, दि.२६ दुपारी अचानक उलट्या सुरू झाल्या. यावेळी समाजातील युवकांनी आणि इतरांनी राजेभाऊ याना उचलुन घेत कॅनॉल कडून रस्त्यावर पाई चालत नेले. त्यानंतर एका मोटार सायकलवर नेण्याचा प्रयत्न केला. मात्र गेल्या १५ दिवसांपासुन सतत पाऊस असल्याने रस्त्यात गुडघाभर चिखल झालेला आहे. त्यामुळे मोटार सायकल चिखलात रुतून बसली. यानंतर आजारी युवकाला बैलगाडीतुन दवाखाण्या पर्यंत आण्याचा प्रयत्न सुरू झाला. या वेळी १०८ क्रमांकाला फोन लाऊन प्राथमिक आरोग्य केंद्राची अब्यूलंन्स बोलावली.

परंतू चिखलामुळे ती काही अंतरावर थांबली. बैलगाडीने आजारी युवकाला अ‍ॅब्युलंन्स पर्यंत आणल्यानंतर तेथून युवकाला वाघाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. अवघ्या अडीच किलोमीटर अंतरासाठी चिखलमय रस्त्याने जवळपास दीड तास लागला. वाघाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात युवकास दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिका-यांनी तपासनी करून उपचारासाठी आणायला दहा मिनिटे उशिर झाल्याचे सांगुन सदरील युवकाला मृत घोषीत केले. या पुर्वीही चिखलमय रस्त्यामुळे प्रसुतीसाठी जाणा-या गरोदर महिला, वयोवृध्द नागरीक यांना आपला जीव गमवावा लागल्याच्या अनेक घटना घडल्या असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.

केवळ रस्त्याअभावी नागरीकांना आपला जीव गमवावा लागत असल्याने या विषयी नागरीकातून तीव्र नाराजी व्यक्त करताना दिसून येत आहेत. शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी देखील याकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना नागरीक व्यक्त करीत असून याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

कोणत्याही राजकीय घडामोडीत सक्रिय नाही

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या