26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeपरभणीजलसंधारण उपविभागाने धमधम पाझर तलावाचे भगदाड बुजवले

जलसंधारण उपविभागाने धमधम पाझर तलावाचे भगदाड बुजवले

एकमत ऑनलाईन

जिंतूर : तालुक्यातील धमधम येथे लघुसिंचन विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या पाझर तलावास अतिवृष्टीमुळे मोठे भगदाड पडले होते़ यामुळे मोठा धोका निर्माण झाला होता़ मात्र जलसंधारण उपविभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांनी तातडीने दखल घेऊन दि़०१ ऑगस्ट रोजी उपाययोजना करून भगदाड बंद केले़ तसेच जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करून पाणी काढून देण्यात आल्यामुळे धोका टळला आहे.

जिंतूर तालुक्यातील धमधम येथे लघुसिंचन जलसंधारण विभाग जालना कार्यालयाच्या वतीने जुन्या रोजगार हमी योजनेंतर्गत २००६-०८मध्ये पाझर तलावाचे काम करण्यात आले होते. मात्र मागील १५ वर्षात एकदाही पाझर तलावाची दुरुस्ती करण्यात आली नसल्यामुळे़ तलावाच्या भींतीवर झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. तसेच सायाळ, उंदीर यांनी तलावाच्या भिंतीला कोरलेले आहे़ परिणामी तलावाच्या भिंती पोकळ होत चालल्या आहेत. यामुळे तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाल्यास तलावाच्या मधूनच पाणी बाहेर निघत आहे.

यामुळे तलावाला धोका निर्माण होत आहे़ असाच प्रकार तालुक्यातील धमधम येथील पाझर तलावाच्या भिंतीमध्ये सायाळ प्राण्याने कोरले असल्यामुळे अतिवृष्टीमुळे भिंतीच्या मधूनच मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडत होते़ यामुळे तलावाच्या मधोमध मोठे भगदाड पडले़ यामुळे तलाव फुटून शेतक-यांचे नुकसान होते की काय असा प्रश्न निर्माण झाला होता.

याबाबत शेतक-यांनी तातडीने महसूल प्रशासनाला माहिती दिली़ तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी तातडीने जलसंधारण विभागाला माहिती देताच जलसंधारण अधिकारी गजानन डुकरे व निवृत्त जलसंधारण अधिकारी ज्ञानदेव शेळके यांनी तातडीने तलावावर भेट देऊन जेसीबीच्या सहाय्याने कामास सुरुवात करून भगदाड बुजवले आहे. तसेच अतिरिक्त पाणीसाठा सांडव्यातुन काढून पाण्याचा दाब कमी केला आहे़ यामुळे तलाव फुटण्याचा धोका टळलेला आहे. शिवाय उपविभागीय जलसंधारण अधिकारी प्रशांत कच्छवा यांनी पाहणी करून आवश्यक त्या सूचना केल्या आहेत तर मंडळ अधिकारी, तलाठी, बामणी पोलीस ठाण्याचे कर्मचारी, गावचे सरपंच आदींनी भेट देऊन पाहणी केली आहे़

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या