22.9 C
Latur
Wednesday, July 28, 2021
Homeपरभणीपाथरीत एकाच रात्रीत पाच औषधी दुकानात चोरी

पाथरीत एकाच रात्रीत पाच औषधी दुकानात चोरी

एकमत ऑनलाईन

परभणी : लॉकडाऊनचा फायदा घेवून पाथरीत चोरट्यांनी एकाच रात्रीत पाच औषधी दुकानांची शटर तोडून रोख रक्कम पळवल्याची घटना मंगळवारी रात्री घडली आहे. दरम्यान सीसीटीव्ही कॅमे-यात चोरटे कैद झाले आहेत. पाथरीतील हनुमाननगर येथील रहिवाशी असलेले श्रीकांत आबासाहेब झिंजान यांचे एकतानगर पाथरी येथे श्रीगणेश औषधी दुकान आहे. नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री साडेनऊ वाजता त्यांनी दुकान बंद केले. मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता झिंजान यांना त्यांचे मित्र माऊली थोरे यांनी तुमच्या दुकानाचे शटर अर्धवट उघडे असल्याचे मोबाईलवरून सांगितले.

त्यामुळे झिंजान यांनी दुकानाकडे धाव घेतली असता दुकानाचे शटर अज्ञात चोरट्याने वाकवून दुकानात प्रवेश केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी झिंजान यांनी दुकानात पाहणी केली असता गल्ल्यातील १५०० रुपये पळवल्याचे निदर्शनास आले. दुकानातील सीसीटीव्ही कॅमे-यात पाहणी केली असता पहाटे २:२० ते २:३५ वाजण्याच्या सुमारास गल्यातील पैसे काढल्याचे दिसून येत आहे. यावेळी झिंजान यांनी त्यांच्या व्यवसायात असणा-या मित्रांना माहिती दिली. त्यानंतर ३.०२ मिनिटांनी बसस्थानकामागे प्रशांत सासवडे यांचे श्री मेडीकलचे शटर तोडून 4 हजार 500 रुपये लंपास केले. तर कंप्यूटरची स्क्रिन आणि कॅमेरा तोडून नुकसान केल्याचे समजते.

याच मेडिकलच्या शेजारी असलेले कृष्णा तौर यांच्या मोरेश्‍वर मेडीकलचेही शटर तोडून दुकानात चोरट्यांनी प्रवेश केला. पण चोरट्यांना रोख रक्कम मात्र मिळाली नाही. एमएसईबी रोड वरील श्रीराम मेडीकलचे मालक ज्ञानोबा शंकरराव वाघ यांच्याही दुकानाचे शटर ३:२० वाजता तीन अज्ञात चोरट्यांनी कटरच्या साह्याने तोडले. मात्र यावेळी पोलिसांच्या गस्तीची गाडी आल्याने चोरट्यांनी येथून पळ काढला. याच ठिकाणी चाबी असलेली एक मोटार सायकल तेथेच ठेऊन चोरटे पसार झाले. ही मोटार सायकल पाथरी पोलिसांनी ताब्यात घेतली असून यामुळे चोरटे सापडतील, अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे. याच दिवशी बाभळगाव येथील सचिन आंबट यांचे गुरुकृपा मेडीकल मधूनही 3 हजार 500 रुपये रोख चोरून नेल्याची झिंजान यांनी पाथरी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

विधिमंडळाच्या निर्णयावर न्यायालयाचा वरवंटा….!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या