27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeपरभणीजैन दादावाडी मंदिरात चोरी, चांदीच्या छत्रसह रोख रक्कम लंपास

जैन दादावाडी मंदिरात चोरी, चांदीच्या छत्रसह रोख रक्कम लंपास

एकमत ऑनलाईन

परभणी : वसमत रस्त्यावरील हॉटेल वाटिका समोरील जैन दादावाडी मंदिरात शुक्रवारी मध्यरात्री चोरी झाल्याची घटना घडली़ या घटनेत अज्ञात चोरट्यांनी दानपेटी फोडून एक ते दीड लाख रूपये तसेच देवाचे चांदीचे छत्र लंपास केले आहे. या घटनेने परीसरात खळबळ उडाली आहे.

शहरापासून जवळच असलेल्या जैन समाजाचे श्रध्दास्थान म्हणून असलेले दादावाडी हे ठिकान प्रसिद्ध आहे. महामार्गलगत असलेल्या या दादावाडीत शुक्रवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी बाजूच्या खिडकी तोडून मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर एक दान पेटी फोडून पैसे काढून घेतले तर दुसरी जवळपास १०० किलो वजनाची दान पेटी पाठीमागे उचलून नेवून भोजन शाळेजवळ फोडली.

यातील रोख रक्कमही लंपास केली. मंदिरामधील देवाचे १ किलो चांदीचे छत्रही चोरट्यांनी लंपास केले. या घटनेत चोरट्यांनी एक ते दीड लाख रूपयांची रोख रक्कम आणि आणि १ किलो वजनाचे चांदीचे छत्र चोरीस गेले आहे़ चोरटे किमान १ तास आवारात असावेत असा अंदाज आहे. कारण या ठिकाणच्या सर्व पेट्या चोरट्यांनी उचकल्या आणि बहुतेक पाठीमागून ते पसार झाले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे़ घटनास्थळी ठसे तज्ञ, श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते़ या घटनेने परीसरात घबराहट पसरली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या