26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeपरभणीकौसडी जि़प़शाळेत कॉम्प्युटर व शैक्षणिक साहित्याची चोरी

कौसडी जि़प़शाळेत कॉम्प्युटर व शैक्षणिक साहित्याची चोरी

एकमत ऑनलाईन

कौसडी : जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील कॉम्प्युटर व शैक्षणिक साहित्याची तोडफोड करून चोरी झाल्याचा प्रकार १३ जून रोजी सकाळी १० वाजता उघडकीस आला़

कौसडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत साहित्याची तोडफोड व कंप्यूटर, ईतर शैक्षणिक साहित्याची चोरी झाल्याचा प्रकार शाळेला सुट्टी असल्याच्या काळामध्ये झाला असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे़ १३ जून रोजी सकाळी १० वाजता मुख्याध्यापक व शाळेतील शिक्षकांनी प्रवेश केला असता ०९ पैकी ०६ खोल्यातील साहित्याची तोडफोड करून काही साहित्य लंपास झाल्याचे दिसून आले़

याबाबत मुख्याध्यापकांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर त्या ठिकाणी बोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत मुळे, पोलीस उपनिरीक्षक अनिल खिल्लारे, शिक्षण विस्तार अधिकारी विजय जोशी यांनी घटनास्थळी भेट देऊन शिक्षक व मुख्याध्यापकांची बैठक घेतली़ या बैठकीत वारंवार चोरीच्या व तोडफोडीच्या घटना घडत असल्यामुळे या ठिकाणी सर्व शाळेतील मुख्याध्यापकांनी या ठिकाणी रक्षकांची नेमणूक करावी अशा सुचना सर्व शाळेतील मुख्याध्यापकांनी पोलिस अधिका-यांना दिल्या़

कौसडी येथे माध्यमिक व प्राथमिक उर्दू आशा जिल्हा परिषदेच्या ०३ शाळा एकाच ठिकाणी आहेत़ या शाळेत सुरक्षा रक्षक नसल्यामुळे तोडफोडीच्या व चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत़ त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करून येथील शाळा सुरक्षित ठेवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे़ येथील शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक मुख्यालयात राहत नसल्यामुळे देखभाल करण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नसल्यामुळे या घटना वारंवार घडत आहेत़

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या