28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeपरभणीअंगणवाडीत पाणी, वीज नसल्याने अन्न शिजेना

अंगणवाडीत पाणी, वीज नसल्याने अन्न शिजेना

एकमत ऑनलाईन

चारठाणा : चारठाणा गावातील काही शाळा व अंगणवाड्यांमध्ये पाणी आहे तर लाईट नाही आणि लाईट असेल तर पाणी नाही अशी अवस्था आहे़ मात्र प्रभाग क्रमांक सहामध्ये बांधलेल्या अंगणवाडीत सर्व सोयीसुविधा असूनही पाणी, वीज नसल्यामुळे येथे बालकांसाठी अन्नही शिजत नाही. या बाबत अंगणवाडीत जाऊन विचारले असता इथे पाणी आणि लाईट नाही त्यामुळे जेवण कसे बनवायचे असा सवाल कर्मचारी करतात़ या परीस्थितीची माहिती गावातील लोकांनी ग्रामपंचायत व पुढा-यांना सांगितली असता त्यांनी लवकरच पाण्याची व्यवस्था करू असे आश्वासन दिले आहे.

जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे गेल्या वर्षी केंद्रीय जलसंधारण विभागाने ६६ टक्के शाळांमध्ये, ६० टक्के अंगणवाड्यांमध्ये आणि ६९ टक्के ग्रामपंचायतींमध्ये नळाला पाणी उपलब्ध असल्याचा दावा केला होता. या माहितीद्वारे देशातील एक तृतियांश सरकारी शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये पिण्याचे पाणी पोहचले नसल्याचे देखील स्पष्ट झाले आहे.

कोरोना महामारीच्या काळात हातपाय धुण्याबाबत देशात जनजागृती केली जात असताना प्रत्यक्षात अनेक राज्यांतील लोक आणि संस्था पिण्याच्या पाण्यापासून वंचित असल्याचे या सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारने असेही म्हटले आहे की शाळा आणि अंगणवाड्या उघडल्या की मुलांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळेल आणि यामुळे आरोग्य आणि स्वच्छता योजनांना चालना मिळेल. मात्र चारठाणा व परिसरातील अनेक शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये असे काहीही दिसत नाही.

चारठा येथील गावचे नेते, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यांना शाळा व अंगणवाडीतील परीस्थितीबाबत कळवूनही अद्याप पाणी व लाईटची सुविधा संबंधित अंगणवाडी व शाळांमध्ये झालेली नाही़ त्यामुळे संबंधित शाळा व अंगणवाडीत शिकणा-या मुलांचे भविष्य काय असेल असा प्रश्न गावक-यांना पडला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या