22 C
Latur
Wednesday, February 8, 2023
Homeपरभणीराजमाला बाजारपेठेत चांगली मागणी राहील : डॉ. ग़डदे

राजमाला बाजारपेठेत चांगली मागणी राहील : डॉ. ग़डदे

एकमत ऑनलाईन

ताडकळस : राजमा या पिकाच्या मुळावर गाठी नसल्यामुळे नत्राची उपलब्धता कमी पडु शकते़ त्यामुळे पिकाला गरज पडल्यावर नत्राचा पुरवठा करावा़ तसेच हरभरा या पिकाला राजमा हा चांगला पर्याय आहे़ राजमामध्ये जिवनसत्व व प्रथिने भरपुर प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे याला बाजारपेठेतही चांगली मागणी राहील अशी आशा प्रक्षेत्र भेटी दरम्यान वनामकृवि कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र व्यवस्थापक डॉ.जी.डी. गडदे यांनी व्यक्त केली.

सद्यस्थितीत जिल्ह्यात कापुस, तुर, सोयाबीन, हळद, ऊस, हरभरा या पारंपारीक पिकांबरोबर बाजारात चांगला दर मिळणा-या राजमा पिकाची लागवड करण्याकडे शेतक-यांचा कल वाढला आहे. त्यामुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, कृषि विज्ञान केंद्र परभणी आणि कृषियोद्धा शेतकरी उत्पादन कंपनी ताडकळस यांच्या मार्फत या पिकांचा प्रचार व प्रसार करण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत पुर्णा तालुक्यात राजमा या पिकाची विविध ठिकाणी लागवड करण्यात आली आहे.

या अनुषंगाने डॉ.जी.डी.गडदे व्यवस्थापक कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र वनामकृवि, अमित तुपे शास्त्रज्ञ उद्यानविद्या व सवाई सिंह निठारवाल शास्त्रज्ञ कृषिविद्या कृषि विज्ञान केंद्र परभणी यांनी पुर्णा तालुक्यातील लिमला, देवठाणा, देऊळगाव, गोळेगाव, ताडकळस आदी ठिकाणी भेटी देवुन राजमा व इतर पिकांची पाहणी केली.

या भेटी दरम्यान उद्यान पंडीत पुरस्कार प्राप्त शेतकरी प्रताप काळे यांनी राजमा लागवड ही रब्बी हंगामात शेतक-यांसाठी क्रांतिकारी बदल घडवेल अशी अपेक्षा व्यक्त केली. या प्रक्षेत्र भेट कार्यक्रमासाठी कंपनीचे सचिव गजानन अंबोरे, पांडुरंग शिंदे, गोविंदराव दुधाटे, मुंजाभाऊ जोगदंड, श्यामराव जोगदंड, पंढरीनाथ शिंदे, विश्वनाथ जोगदंड, सुदामराव दुधाटे, मोतीराम दुधाटे, उध्दवराव दुधाटे यांच्यासह परिसरातील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या