26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeपरभणीविद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारावर चोरट्यांंचा डल्ला

विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारावर चोरट्यांंचा डल्ला

एकमत ऑनलाईन

चारठाणा : जिंतूर तालुक्यातील चारठाणा जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील शालेय पोषण आहाराच्या खोलीचे कुलुप तोडून चोरट्यांनी ५० किलो तांदूळ व ७० किलो हरबरा लंपास केल्याची घटना शनिवार दि.१५ रोजी रात्रीच्या सुमारास घडली. दरम्यान पंधरा दिवसात दुस-यांदा घटना झाल्याने शालेय व्यवस्थापन समितीने पोलिसांत तक्रार दिली असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

जिंतूर तालुक्यातील चारठाणा बसस्थानक परिसरात जिल्हा परिषदेची माध्यमिक शाळा आहे. सध्याला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाँकडाऊन असुन शाळा बंद आहेत. दरम्यान शालेय पोषण आहार एका खोलीत ठेवण्यात आला होता. या पुर्वी ३० एप्रील रोजी अज्ञात चोरट्यांनी शालेय पोषण आहार योजनेच्या खोलीचे कुलुप तोडून आतमध्ये प्रवेश करून ५० किलो तांदूळ पळविले होते. या बाबत मुख्याध्यापक डी.यु राठोड व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सविता रमेश ढगे यानी चारठाणा पोलीस ठाण्यात शालेय पोषण आहार चोरीला गेल्याची तक्रार दिलेली आहे.

दरम्यान पंधरा दिवसापुर्वीच चोरीची घटना घडलेली असताना शनिवारी दि.१५ रोजी मध्यरात्री अज्ञात चोरटयांनी त्याच शालेय पोषण आहार खोलीचे कुलुप तोडून ५० किलो तांदूळ व ७० किलो हरभरा असा एकुण ८ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. रविवार दि.१६ मे रोजी शालेय पोषण आहार खोलीचे कुलुप तोडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खोलीत जावून पाहणी केली असता तांदूळ व हरबरा चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर शिक्षक संकेत नालटे व शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सविता रमेश ढगे यानी पोलीस ठाणे गाठून तांदूळ चोरटयाचा बंदोबस्त करण्याची मागणी पोलीसांकडे केली आहे. पंधरा दिवसात दोन वेळा शालेय पोषण आहारावर डल्ला मारणा-या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकातून केली जात आहे.

धोका म्युकर मायकोसिसचा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या