26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeपरभणीमानवत शहरात चोरट्यांनी दोन दुकाने फोडली

मानवत शहरात चोरट्यांनी दोन दुकाने फोडली

एकमत ऑनलाईन

मानवत : मागील काही दिवसात शहरात विविध ठिकाणी चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. या चोरीच्या घटनांचा तपास सुरू असतानाच दि. ५ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास मानवत अर्बन बँक समोरील कत्रुवार कापड दुकान व साई कलेक्शन उंबरकर यांच्या कापड दुकानात चोरी झाली. शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने शोभेची वस्तू बनले आहेत. शहरातील वाढत्या चो-यांमुळे व्यापा-यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील चो-यांत वाढ होत असल्याने चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान निर्माण केल्याची चर्चा नागरिकांतून ऐकावयास मिळत आहे.

शहरातील मेन रोडवरील असलेल्या कत्रुवार कापड दुकान व साई कलेक्शन उंबरकर यांच्या दुकानात दि. ५ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास ह्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. या घटनेत दोन्ही दुकान मागच्या बाजुने चोरट्यांनी फोडून दुकानात प्रवेश करीत दुकानातील कपडे व मुद्देमाल लंपास केला आहे. शहरात गेल्या दोन महिन्यांपासून विविध ठिकाणी चोरीचे प्रमाण वाढल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. चोरट्यांनी वाढत्या धुमाकूळाने व्यापा-यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. चोरट्यांना शोधण्याचे पोलिस प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

लाल फितीच्या कारभारात सीसीटीव्ही पडले धूळखात
येथील नगर परिषदेच्यावतीने शहरात जवळपास ५८ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्याचा शहरातील नागरिकांना उपयोग व्हावा यासाठी हे सीसीटीव्ही कॅमेरे पोलिस प्रशासनाला हस्तांतरित करण्यात आले. परंतू सीसीटीव्ही दुरुस्ती कुणी करायचा हा प्रश्न निर्माण झाला असल्याने सद्यस्थितीत हे कॅमेरे बंद अवस्थेत असल्याने शोभेची वस्तू बनली आहेत. सीसीटीव्ही कॅमे-याची जबाबदारी पोलिस प्रशासनाची की नगर परिषदेची असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकंदरच लाल फितीच्या कारभारात सीसीटीव्ही धूळखात पडल्याने नागरिकांतून मात्र तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या