20.8 C
Latur
Saturday, September 18, 2021
Homeपरभणीपंधरा शेतक-यांना तीस लाखांचा गंडा

पंधरा शेतक-यांना तीस लाखांचा गंडा

एकमत ऑनलाईन

परभणी : जिंतूर तालुक्यातील शेवडीसह परिसरातील 15 हून अधिक शेतक-यांची दोघा भामट्यांनी तब्बल 30 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याबाबत जिंतूर पोलिस ठाण्यात बुधवारी (दि.16) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शेवडी येथील शेतकरी बालाजी आश्रोबा घुगे यांनी जिंतूर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अमोलअप्पा अशोकअप्पा एकशिंगे व बाळूअप्पा वैजनाथअप्पा एकशिंगे या दोघांविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेवडी (ता.जिंतूर) व परिसरातील गावांतील शेतक-यांची हळद व सोयाबीन 25 जून रोजी अमोलअप्पा अशोकअप्पा एकशिंगे व बाळूअप्पा वैजनाथअप्पा एकशिंगे या दोघांनी आडत दुकानासाठी खरेदी केले होते. गावातील शेतक-यांचा विश्वास संपादन करीत कच्चा पावत्या करून पैसे थोड्या दिवसांनी देतो असे सांगण्यात आले. शेतक-यांनी दोघांच्याही बोलण्यावर विश्वास ठेवला. जवळपास 30 लाख 87 हजार 644 रुपयांचे सोयाबीन व हळद या दोघांनी खरेदी केली होती. जून महिन्यात हा व्यवहार झाला होता. आडतीसाठी खरेदी असल्याने पैसे नंतर देतो, असे सर्वांना या दोघांकडून सांगण्यात आले होते. मात्र, अद्यापही शेतक-यांना त्यांच्या मालाचे पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे पैश्यासाठी संपर्क केला असता दोघांचेही मोबाईल बंद असल्याचे सांगण्यात येत होते. विशेष म्हणजे त्यांनी आडत दुकान बंद केले. दुसरीकडे संबंधितांचा कुठेच संपर्क होत नसल्याने आपली फसवणूक झाली असल्याचे शेतक-यांच्या लक्षात आले.

आपल्याला लुबाडले गेले असल्याचे लक्षात येताच बुधवारी बालाजी आश्रोबा घुगे यांच्यासह परिसरातील 15 हून अधिक शेतक-यांनी जिंतूर पोलिस ठाण्यात धाव घेत दोघांनी 30 लाख रुपयांची फसवणूक केली असल्याची तक्रार दिली. या तक्रारीवरून दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आ.े अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री.स्वामी हे करीत आहेत. एकशिंगे याने काही शेतक-यांना रकमेचे धनादेशही दिले होते. हे धनादेश शेतक-यांनी बँकेत टाकल्यानंतर वटले नसल्याने चेक बाऊंस झाल्याचे प्रकारही समोर आले आहे. एकंदरच या सर्व प्रकरणात अनेक शेतकरी लुबाडले गेल्याचे उघड झाल्यानंतर संपूर्ण जिंतूर तालुक्यात या प्रकरणाची चर्चा होताना दिसून येत आहे. दरम्यान, शेवडी गावासह अन्य 15 शेतक-यांची हळद व सोयाबिन खरेदी प्रकरणात फसवणूक झाल्याचे उघड झाले असून संबंधित दोघा भामट्यांचा शोध सुरू आहे. अन्य कोणाची अशी फसवणूक झाली असेल तर त्यांनी जिंतूर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी केले आहे.

‘तृणमुल’चे आमदार अधिकारी यांचा आमदारकीचा राजीनामा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या