28 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeपरभणीजिल्ह्यात गेल्या चार महिन्यात तेहतीस गुन्ह्यांची उकल

जिल्ह्यात गेल्या चार महिन्यात तेहतीस गुन्ह्यांची उकल

एकमत ऑनलाईन

परभणी : नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.13) जिल्ह्यातील वरिष्ठ अधिका-यांची गुन्हे विषयक आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत मोठ्या गुन्ह्यांची उकल केल्याबद्दल, गुन्ह्यातील आरोपींचा तात्काळ शोध घेतल्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखा, विशेष पथकाचे अधिकारी – कर्मचारी यांचा प्रमाणपत्रे देवून गौरव करण्यात आला. विशेष म्हणजेऑक्टोब २०२० ते फेबु्रवारी २०२१ या चार महिन्यात ३३ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिस यंत्रणेला यश आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

या बैठकीस जिल्हा पोलिस अधिक्षक जयंत मीना, अप्पर पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, सहाय्यक पोलिस अधिक्षक (परभणी) अविनाश कुमार, सहाय्यक पोलिस अधिक्षक (जिंतूर) श्रवण दत्त, उपविभागीय पोलिस अधिकारी मिलींद खोडवे यांच्यासह प्रभारी पोलिस उपअधिक्षक, जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांचे पोलिस निरीक्षक आदिंची उपस्थिती होती.

यावेळी श्री. तांबोळी यांनी जिल्ह्यातील गुन्ह्यांचा आढावा घेतला. या बैठकीत मोठ्या गुन्ह्यांची उकल केल्याबद्दल, गुन्ह्यातील आरोपींचा तात्काळ शोध घेतल्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखा, विशेष पथकाचे अधिकारी – कर्मचारी यांचा प्रमाणपत्रे देवून गौरव करण्यात आला. विशेषत: जिल्ह्यात 10 ऑक्टोबर 2020 ते 12 फेबु्रवारी 2021 दरम्यानच्या 33 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिस यंत्रणेस यश आले आहे. हे गुन्हे उघड करणा-या पोलिस अधिकारी व कर्मचा-यांचा विशेष पोलिस उपमहानिरीक्षक श्री. तांबोळी यांनी प्रमाणपत्र देवून गौरव केला.

अर्धविरामाचा अन्वयार्थ !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या