22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeपरभणीशिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

एकमत ऑनलाईन

परभणी : येथून जवळच असलेल्या परभणी तालुक्यातील जिल्हा परिषद प्रशाला पेडगाव येथील शिक्षकांच्या रिक्त जागा तात्काळ भरून विद्यार्थ्याचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्याच्या मागणीसाठी सोमवार, दि़ २२ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे विद्यार्थ्यांसह पालक व ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले.

या वेळी प्रशासनास देण्यात आलेल्या निवेदनात पेडगाव येथील जिल्हा परिषद प्रशालेतील रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत़ तसेच पेडगाव येथील जिल्हा परिषद प्रशालेत या शैक्षणिक वर्षात विज्ञान विषय शिक्षकांचे पद रिक्त असल्याने इयत्ता ९ वी व १० वी वर्गांचा विज्ञान विषयांचा अभ्यासक्रम आजपर्यंत शिकविण्यात आला नाही़.

त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून विज्ञान विषय शिक्षकांचे रिक्त पद ताबड़तोब भरावे़ पेडगाव जिल्हा परिषद प्रशालेत पदवीधर शिक्षकांच्या दोन जागा रिक्त असल्यामुळे सेमी इंग्रजी विज्ञान व गणित विषयांच्या ०५वी ते ०८वीच्या तासिका होत नाहीत़ त्यामुळे ही रिक्त पदेही ताबडतोब भरावी अशी मागणी विद्यार्थी व पालक तसेच ग्रामस्थांनी केली आहे़ यावेळी करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष परभणी संतोष देशमुख, पेडगाव चेअरमन दीपक देशमुख, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्याक सरचिटणीस शेख सलमान, राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे उपाध्यक्ष आशिष हरकळ, गोपाळ देशमुख, माऊली टाकळकर, बाळू पैठने, हनुमान देशमुख, शेख रसूल भाई आदी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या