25 C
Latur
Monday, May 17, 2021
Homeपरभणीखा.जाधव यांना जिवे मारण्याची धमकी; नानलपेठ ठाण्यात गुन्हा दाखल

खा.जाधव यांना जिवे मारण्याची धमकी; नानलपेठ ठाण्यात गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार बंडू जाधव यांनी आपल्या जिवाला धोका असल्याची तक्रार केली आहे. मंगळवारी रात्री उशिरा स्वत: नानलपेठ पोलिस ठाणे गाठून त्यांनी ही तक्रार नोंदवली. खा. जाधव यांनी माझ्या जीवाला धोका असून आपल्याला सुपारी देऊन जीवे मारण्याचा कट रचण्यात येत असल्याची तक्रार स्वत: परभणी येथील नानलपेठ पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा दिली.

परभणीचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी दिलेल्या तक्रारीत आपल्याला सुपारी देऊन जीवे मारण्याचा कट रचल्याचे म्हटले आहे. आपल्याला दोन दिवसांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीने फोन करून जीवे मारण्याची धमकीही दिली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याबाबत परभणीतून दोन कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. नांदेडमधील एका मोठ्या टोळीने हा कट रचला आहे असेही खा. जाधव यांनी पोलिसांना सांगितले. मंगळवारी नांदेडमधील एक मोठी टोळी या प्रकरणी कार्यरत आहे, असे सांगत आपल्याला जीवे मारण्याची सुपारी देणारा परभणीतील व्यक्ती असल्याचा असावा असा आरोप खा. जाधव यांनी केला आहे.

परभणीतील एका बड्या व्यक्तीकडून आपणास जीवे मारण्याची सुपारी देण्यात आली असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. ही माहिती विश्वासू व्यक्तीकडून समजली असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. खा.जाधव यांनी स्वत: पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिल्याने नानलपेठ पोलिसांनी तातडीने कार्यवाही करीत या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे हे करीत आहेत.

खा.जाधव यांना धमकी देणा-यांस अटक करा
परभणी लोक सभा मतदार संघाचे शिवसेनेचे लोकप्रिय विकास पूरूष खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांना दोन दिवसापुर्वी खूनाचा कट रचल्याची माहिती स्वत: मिळाली आसता. परभणी लोक सभा मतदार संघाचे शिवसेनेचे लोकप्रिय , विकास पूरूष खासदार श्री संजय जाधव यांचा खुणाची सुपारी घेऊन कट रचणारे व तसेच परभणीतील त्यांचे सुत्रधार यांची तात्काळ चौकशी करून अटक करावी व त्यांच्यावर कठोर कार्यवाही करावी नसता मानवत तालूका शिवसेनेच्या वतिने शिव सेना स्टाईल ने तिव्र अंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा शिव सेनेच्या वतीने एका निवेदना द्बारे देण्यात आला.

मानवत तहसिलचे तहसिलदार डि.डि.फुफाटे यांना देण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आला.या वेळी शिव सेनेचे उपतालूका प्रमूख, माणिकराव काळे , मा.शिवसेना शहर प्रमुख अनिल जाधव ,बालाजी दहे शिवसेना शहरप्रमुख, युवा सेना परभणी जिल्हाप्रमुख दिपक बारहात्ते ,ा,बंडू मुळे, मानवत पंचायत समितीचे सभापती,दत्तराव जाधव, संतोष अंबेगावकर जाधव , ,राजेश कच्छवे,नरेश गौड,शंकर तर्टे,आप्पा भिसे,नंदू पाटील,राजाराम महिपाल आदी.

दिल्लीच्या पराभवाची हॅट्ट्रिक; हैदराबाद चे उर्वरित दोन्ही सामने उपान्त्यपूर्वच

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,496FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या