Saturday, September 23, 2023

उखळद हत्या प्रकरणातील तीन आरोपी पोलीस कोठडीत

परभणी : परभणी तालुक्यातील उखळद येथे दि.२७ मे रोजी पहाटे ३ वाजताच्या सुमारास डुकराची शिकार करण्यासाठी गेलेल्या ०३ युवकांना चोर समजून बेदम मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले होते. यातील किरपालसिंग सुरजितसिंग बोंड (वय १४ वर्ष) याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला होता. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ०३ आरोपींना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणी गोरासिंग गुरुबच्चन सिंग दुधानी यांनी ताडकळस पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ०५ अनोळखी आरोपी व अन्य काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास ताडकळस पोलीस ठाण्याचे ठाणेदार कपिल शेळके हे करीत आहेत. दरम्यान, उखळद घटनेतील आरोपी एकनाथ सटवाजी कुंभारकर (वय २८ वर्षे), सय्यद एजाज सय्यद इब्राहीम (वय ३६वर्षे) यांंना परभणी येथील न्यायालयात दि.२७ मे रोजी हजर केले असता त्यांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर सय्यद अकरम सय्यद अजमिया या आरोपीस २९ मे रोजी अटक करण्यात आली आहे.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या