परभणी : पोलिसांनी इंडिगो कारमधून तीन लाख रुपयांचा गुटका सोमवारी (दि.नऊ) रात्री दहाच्या सुमारास जप्त करीत तीन आरोपींना अटक केली. जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी फौजदार विश्वास खोले, फौजदार चंद्रकांत पवार, कर्मचारी सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, यशवंत वाघमारे, श्री. मोदीराज, बालासाहेब गिते यांच्या पथकाने ही कारवाई केली.
परभणीत वाहनाव्दारे गुटक्याची मोठ्या प्रमाणात चोरटी वाहतुक सुरू आहे. सोमवारी रात्री शहरात गुटका येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षक श्री. मीना यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी रात्री एमआयडीसी समोर वसमत रस्त्यावर सापळा लावण्यात आला. यावेळी एका इंडिगो कारला (क्र. एमएच 22 झेड 0555) थांबवून कारची तपासणी करण्यात आली.
तेव्हा त्या कारमध्ये बंदी घालण्यात आलेल्या गोवा, वजीर सुगंधीत तंबाखूचा मोठा साठा पथकास आढळला. पथकातील अधिकारी – कर्मचार्यांनी त्या साठ्याची मोजदाद केली. त्यावेळी तीन लाख तीन हजार सहाशे रुपयांचा प्रतिबंधित केलेला वेगवेगळ्या कंपनीचा गुटका व सुगंधी तंबाखू तसेच कार पथखाने जप्त केली. तीन व्यक्तींना अटक करण्यात आली. पोलिस कर्मचारी यशवंत वाघमारे यांनी नवामोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास फौजदार अजय पाटील हे करीत आहेत.
पाकची समितीत राहण्याची लायकी नाही