24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeपरभणीटिप्पर - दुचाकी अपघातात एक ठार

टिप्पर – दुचाकी अपघातात एक ठार

एकमत ऑनलाईन

परभणी : शहरातील अपना कॉर्नर ते धाररोड जाणा-या रस्त्यावरील डॉ़ झाकीर हुसेन महाविद्यालयासमोर झालेल्या टिप्पर व दुचाकीच्या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवार दि. ३१ रोजी दुपारी ११़३० च्या सुमारास घडली.

याबाबत माहिती अशी की, मदिना नगरातील रहिवाशी सय्यद समिर सय्यद नसीर (वय २०) हा युवक शटरचे वेल्डींगच्या दुकानावर काम करतो़ बुधवारी सकाळी ११़३० च्या सुमारास अपना कॉर्नर परिसरात अपना हॉटेलच्या शटर बसविण्यासाठी तो आला होता. दरम्यान काही कामानिमित्ताने तो अपना कॉर्नरवरून धाररोडने आपल्या दुचाकीवर (एम़एच़३८ के ०९०९) जात असतांना डॉ. झाकीर हुसेन महाविद्यालयासमोर समोरून जाणा-या टिप्पर (एम़एच २२ एन ११५७) अचानक पलटल्याने दुचाकी टिप्परवर जावून धडकली.

या अघातात दुचाकीवरील सय्यद समिर सय्यद नसीर हा युवक गंभीर जखमी होवून जागीच ठार झाला़ दरम्यान त्या परिसरात गणेशोत्सवाच्या बंदोबस्तासाठी असलेल्या होमगार्डने तात्काळ घटनास्थळी धाव घेवून त्या युवकास शासकीय रूग्णालयात पाठविले तर टिप्पर नानलपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच नगरसेवक पाशा कुरेशी व जाकेर लाला यांनी शासकीय रूग्णालयास भेट दिली़ या प्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे़

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या