30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeपरभणीराष्ट्रवादीच्या नेत्यांना कंटाळून ? खा. जाधव यांनी दिला राजीनामा

राष्ट्रवादीच्या नेत्यांना कंटाळून ? खा. जाधव यांनी दिला राजीनामा

एकमत ऑनलाईन

परभणी : जिंतूर येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्याच्या कारणावरून नाराज झाले. जिल्हयात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे वर्चस्व .असून शिवसेनेच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांच्या कामाला प्राधान्य दिले जात नसल्याच्या कारणावरून खा. संजय जाधव यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केल्याचे बोलले जात आहे. मात्र अद्यापही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राजीनामा स्विकार केला नसल्याचे वृत्त आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मोनोपल्ली विरुद्ध शिवसेनेचे खा. संजय जाधव यांनी बंड पुकारला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंगळवारी खा. जाधव यांनी एक लेखी पत्र पाठवून राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनी पदोपदी सुरू केलेल्या हस्तक्षेपासह दादागिरी विरुद्ध तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या त्या पत्रातून जिल्ह्यासह राज्यातील काही धोरणात्मक निणर््यातील एकतर्र्फी हस्तक्षेपाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे.राष्ट्रवादीच्या या एकतर्र्फ निर्णयप्रक्रिये विरुद्ध पक्ष श्रेष्ठींनी तातडीने गांभीर्याने दखल घ्यावी असेही म्हंटले आहे.या पत्रात आपण अन्य बाबींचा सुद्धा उल्लेख केला आहे. सत्तेत असतानासुद्धा राष्ट्रवादीच्या एकतर्र्फी भूमिका,निर्णय पूर्णत: चुकीचे असल्याचे म्हंटले आहे.श्रेष्ठींनी आपल्या पत्राची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी केली. काही माध्यमांनी आपण राजीनामा दिल्याच्या बातम्या दिल्या आहेत, त्याबाबत जाधव यांनी कोणताही खुलासा केला नाही.

तुळजाभवानी मंदिराची नुतन जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या