23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeपरभणीजीवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर अत्याचार

जीवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर अत्याचार

एकमत ऑनलाईन

जिंतूर : तालुक्यातील साखरतळा येथील एका विवाहितेस जीवे मारण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार केल्या प्रकरणी पोलिस ठाण्यात प्रमोद ठाकरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साखरतळा येथील एका २७ वर्षीय विवाहितेची ग्राम पंचायत निवडणुकीदरम्यान प्रमोद ठाकरे याच्याशी ओळख झाली होती. ठाकरे हा नात्यातील असल्यामुळे वारंवार घरी येत होता. मार्च २०२२ मध्ये प्रमोद ठाकरे याने सदर विवाहितेस महत्वाचे काम आहे, असे म्हणून गावातील जि.प. शाळेच्या पाठीमागे बोलावले. जवळपास कुणी नसल्याची संधी साधून त्याने विवाहितेच्या हाताला धरुन जबरदस्तीने शेतात ओढून नेले व तिच्यावर अत्याचार केला.

यानंतर २० एप्रिल रोजी सुद्धा त्याने अशीच जबरदस्ती करुन अत्याचार केला व हा प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. अखेर या प्रकारास कंटाळून सदर विवाहितेने ३१ मे रोजी जिंतूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन प्रमोद ठाकरे याच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६ (२) (एन) ३२३, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या