गंगाखेड : शहरात एका दिग्गज व्यापा-याचा शाही स्वागत सभारंभास गेलेल्या नामावंत व्यापा-यामुळेच शहरात कोरोना रूग्ण वाढले आहेत. परिणामी प्रमुख रस्ते आणि अर्धेअधीक शहर प्रतिबंधित क्षेत्र बनले आहे.याचा त्रास सर्व सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे एकाच भागात दुसरा करोना रूग्ण सापडल्याने प्रतिबंधित क्षेञाचा कालावधीत वाढ होत आसल्याने प्रतिबंधित क्षेत्राचे निकष बदलावेत,अशी अजब मागणी या भागातील निवडक व्यापाºयानी केल्याने शहरात उलटसुलट चर्चा रंगत आहेत.
शहरात दिग्गज व्यापा-याचा शाही लग्न सभारंभाचा शाही भोजनावर नामावंत व्यापाºयाने ताव मारत चांदीचा वाटीत चांदीचा चमच्याने मिठाई खात शहरात कोरोनाचा प्रसार केल्याने रूग्णांची संख्या वाढतच आहे.शहराच्या सर्वच भागांमध्ये कोरोना रूग्ण आढळून आल्याने हे भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषीत करण्यात आले आहेत.या भागातील नागरिकांना २८ दिवस या क्षेत्राबाहेर पडण्याची परवानगी नाही. तसेच बाहेरचे कोणी या क्षेत्रात प्रवेश करू शकत नसताना अनेक नागरिकासह व्यापारी बिनदास्त बाहेर पडत आहे.
या क्षेत्रीतील कोणत्याही व्यापा-यास दुकान ऊघडण्याचीही परवानगी नसतानाही प्रतिबंधित क्षेत्रातील व्यापारी गोदामातुन व्यापार करीत आहेत. दिलकश चौक ते भगवती चौक या भागातील एका कोरोना रूग्णाचा कोरोना अहवाल नकारात्मक येण्याचा आधीच याच भागात दुसरे रूग्ण आढळून आल्याने आहेत.या भागातील प्रतिबंधात्मक क्षेत्र तब्बल दिड महिन्यांपर्यंत कायम राहणार आसल्याने या भागातील नामावंत कपडा भांडी व्यापा-याने कोरोना रूग्ण आढळल्यानंतर तो संपुर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषीत करण्याऐवजी ती ईमारत आणि आजुबाजूची एखाद दुसरी ईमारतच सील करण्यात यावी अशी अजब मागणी तहसिलदार यांचा करण्यात आली.
हिच मागणी यापूर्वीच केली आसती तर केवळ एकच ईमारत प्रतिबंध क्षेञ झाली आसती पण केवळ आपले दुकान बंद होत आसल्याने केलेली अजब मागणीची चर्चा शहरात होत आहे.संपूर्ण लाँक डाउन मध्ये समोरून दुकान बंद करून घरातुन व्यापार करणा-या याच व्यापा-यावर गुन्हेही दाखल झाले होते.संपूर्ण शहरातील बहुतांशी भाग कंटेन्मेट झोन झाले आसताना केवळ आपलाच भाग खुला करण्याची मागणी करून आपल ते बाळ दुसºयाच कार्ट अशीच म्हणण्याची वेळ आली आहे.शहरात कोरोनाचा प्रसार करणारा शाही सभारंभ आयोजकासह शाही मेजवानीस उपस्थित राहणा-या नामावंत व्यापाºयावरही कायर्वाही मागणी शहरात होत आहे.
Read More सिव्हिल हॉस्पिटलमधील कोरोना वॉर्डचे लोकार्पण