29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeपरभणीलॉकडाऊन विरोधात व्यापा-यांची निदर्शने

लॉकडाऊन विरोधात व्यापा-यांची निदर्शने

एकमत ऑनलाईन

परभणी: प्रशासनाने लागू केलेल्या लॉकडाऊनच्या विरोधात व्यापा‍-यांनी गुरुवार दि.८ रोजी छत्रपती शिवाजी चौकात जोरदार निदर्शने करीत बाजारपेठेतील दुकाने उघडे ठेवू द्या या मागणीचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. शहरातील व्यापारी गुरुवारी छत्रपती शिवाजी चौकात एकत्रित आले. जिल्हा प्रशासनाने दुकाने उघडे ठेवण्याची परवानगी द्यावी, कोरोनाचे सर्व नियम आम्ही पाळूत, सोशल डिस्टंसिंगसह मास्क वापरूत, आरोग्याची काळजी घेण्याचे आम्हालाही मान्य आहे.

मात्र, दुकाने उघडूच दिली नाही तर आम्ही दुकानाचे लाईटबील, कामगारांचे पगार केस द्यावेत, व्यापारी वर्ग पूर्णत: भरडला जात असल्याचे नमूद करीत दुकानांना सूट द्यावी, अशी मागणी यावेळी व्यापार्‍यांनी केली. यावेळी व्यापार्‍यांनी काही वेळ घोषणाबाजी करत परिसर दणामून सोडला. नानलपेठ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी तिप्पलवाड हे अन्य अधिकारी – कर्मचार्‍यांसह दाखल झाले होते.

निर्वासित रोहिंग्यांना परत पाठवले जाऊ शकते; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या