22.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeपरभणीजुगारावरील धाडीत साडेबारा लाखांचा मुद्देमाल जप्त

जुगारावरील धाडीत साडेबारा लाखांचा मुद्देमाल जप्त

एकमत ऑनलाईन

परभणी : पोलिस अधीक्षक जयंती मिना यांच्या मार्गदर्शनाखाली मानवत शहरातील रामेटाकळी शिवारात विनापरवाना जुगार खेळणा-या ठिकाणावर पोलिसांच्या विशेष पथकाने छापा टाकून ५ जणांना पकडले. या छाप्यात ७ दुचाकी, एक चारचाकी वाहन व रोख ३९ हजार ७२० रूपये असा एकुण १२ लाख ४९ हजार ७२० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मानवत शहरातील रामेटाकळी शिवारात पोलिसांनी धाड टाकली असता बेकायदेशीररित्या झन्ना मन्ना नावाचा मटका जुगार खेळत असताना पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या जवळून रोख ३९ हजार ७२० रूपये, २ लाख १० रूपये किंमतीच्या ७ दुचाकी व १० लाख रूपये किंमतीचे एक चार चाकी वाहन असा १२ लाख ४९ हजार ७२० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी मानवत पोलिसांत ८ जणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून ३ आरोपी फरार आहेत. ही कारवाई पोउपनि.विश्वास खोेले, चंद्रकांत पवार, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, यशवंत वाघमारे, अजहर पटेल, राहुल चिंचाणे, दिपक मुदीराज, शंकर गायकवाड, विष्णू भिसे आदिंनी केली.

बिबटयाच्या हल्यात करमाळयातील आठ बर्षीय चिमूरडी ठार

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या