27.3 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeपरभणीपरभणी जिल्ह्यात पंचवीस नवे रुग्ण; एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू

परभणी जिल्ह्यात पंचवीस नवे रुग्ण; एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू

एकमत ऑनलाईन

प्रतिनिधी : परभणी जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कोरोना विषाणूचा संसर्ग आता कमी प्रमाणात झाला असला तरी आज दिवसभरातून 416 व्यक्तींची तपासणी करण्यात आली यात पंचवीस व्यक्ती कोरोना बाधित आढळून आले आहेत तर एका बाधित याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

परभणी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रुग्ण संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत होती मात्र गेल्या आठ दिवसांपासून ही संख्या रोडावली आहे दररोज 25 ते 30 रुग्ण सध्या आढळून येत आहेत त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत 6312 रुग्ण आढळून आले आहेत असली तरी 5800 दोन रुग्ण उपचारानंतर घरी गेले आहेत तर दुर्दैवाने आतापर्यंत 256 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर सध्या रुग्णालयात 254 व्यक्ती उपचार घेत आहेत.

मंगळवारी दिवसभरातून चारशे सोळा व्यक्तींची तपासणी करण्यात आली यात पंचवीस व्यक्ती बाधित आढळून आले आहेत तर 38 व्यक्ती उपचारानंतर घरी गेले आहेत कोरोनाविषाणू वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य प्रशासन खबरदारी म्हणून उपाययोजना करीत आहेत दोनच दिवसापूर्वी आरोग्य मंत्री परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी परभणी जिल्ह्याचा वाढता मृत्यू दराबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

रब्बी हंगामात अखंडित वीजपुरवठा करणार ! ऊर्जामंत्री नितीन राऊत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या