25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeपरभणीजिंतूरमध्ये वीज कोसळून दोन जनावरांचा मृत्यू

जिंतूरमध्ये वीज कोसळून दोन जनावरांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

जिंतूर : जिंतूर शहर व परिसरात अचानक सुरु झालेल्या अवकाळी पावसात तालुक्यातील धमधम येथे वीज अंगावर कोसळून दोन जनावरांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. १) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. यात शेतक-याचे सुमारे एक लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.

शहर व परिसरात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी वा-यासह पावसाला सुरूवात झाली. यावेळी विजा कडाडत होत्या. याच काळात धमधम येथील शेतकरी रामराव घुले यांच्या शेतातील एक बैल आणि एका गायीच्या अंगावर वीज कोसळून दोन्हींचा मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळाल्यावर पशुवैद्यकीय अधिकारी आणि तलाठी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या