24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeपरभणीचारठाणा पुलावर खड्डयामुळे दुचाकीस अपघात; युवक गंभीर जखमी

चारठाणा पुलावर खड्डयामुळे दुचाकीस अपघात; युवक गंभीर जखमी

एकमत ऑनलाईन

जिंतूर : जिंतूर-औरंगाबाद महामार्गावरील चारठाणा जवळील पुलावर धोकादायक बनलेल्या खड्ड्यामुळे दुचाकीस अपघात होऊन एक २३ वर्षीय युवक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार, दि.२२ रोजी रात्री ९.३० च्या सुमारास घडली. युवकाची प्रकृती गंभीर असल्याने जिंतूर शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ परभणी जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

जिंतूर तालुक्यातील आसेगाव येथील गजानन राजकुमार पवार हा युवक एम.एच.२० एफ.एस. ७७३४ या दुचाकीवरुन जिंतुरहुन औरंगाबादकडे जात असताना रात्रीच्या वेळी त्याला चारठाणा पुलावरील धोकादायक बनलेल्या खड्ड्याचा अंदाज आला नसल्याने दुचाकीचा अपघात झाल्याचे समजते अपघाताच्या घटनेनंतर चारठाणा पोलिस, पोलिस मित्र तारेक देशमुख, साबेर पठाण, अन्नु पठाण, अफसर शेख, तालेब कुरेशी आदींनी अपघातस्थळी धाव घेऊन सदर युवकास एका खासगी वाहनाने चारठाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. परंतू मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने प्राथमिक उपचार करुन सदर युवकास तातडीने पुढील उपचारासाठी जिंतुर ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉ.अनिफखाँन, परिचारका शिंदे, गंगाधर पालवे यांनी उपचार केले़ परंतू प्रकृती खालावत असल्याने सदरील युवकास जिल्हा सामान्य रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे.

खड्डयामुळे दररोज घडत आहेत अपघात
जिंतूर- औरंगाबाद महामार्गावरील खड्डे काही महिन्यापूर्वीच थातूरमातूर बुजवले होते. पावसाने रस्ता पुन्हा खड्डामय झाला असल्याचे बोले जात आहे. तसेच चारठाणा पुलाच्या ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने नेहमी वाहनांची वर्दळ या रस्त्यावर असते़ त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. खड्डयामुळे पुलावर वाहनाच्या रागा लागत असून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. पुलावरील खडयामुळे पुलाला धोका निर्माण झाला आहे. वाढते खड्डे लक्षात घेता खड्डे तात्काळ बुजवणे गरजेचे बनले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या