27.3 C
Latur
Thursday, March 23, 2023
Homeपरभणीबस चालकास मारहाण; दोन वर्षे कारावास

बस चालकास मारहाण; दोन वर्षे कारावास

एकमत ऑनलाईन

परभणी : जिंतूर आगारातील बस चालक ज्ञानोबा श्रीराम पजई यांना क्षुल्लक कारणातून जिंतूर तालुक्यातील रायखेडा येथील युवक कृष्णा सचिन राठोड याने मारहाण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पजई यांनी चारठाणा पोलीसांत तक्रार दिली होती. या प्रकरणी मारहाण करणा-या युवक राठोड याला जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

या बाबत चारठाणा पोलीस ठाण्यात ज्ञानोबा श्रीराम पजई यांनी १७ ऑक्टोबर २०१९ रोजी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत सावरगाव (ता. जिंतूर) येथून बस जिंतूरकडे घेवून जात असताना सकाळी ९.१५ वाजता कृष्णा राठोड (रा.रायखेडा ता. जिंतूर) याने अचानक बस समोर मोटरसायकल समोर आडवी लावून आपणास तू साईड का देत नाहीस असे म्हणत शिवीगाळ केली व बसच्या केबिनमध्ये चढून धक्काबुक्की करीत मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद केले होते.

या तक्रारीच्या आधारे चारठाणा पोलिसांनी संबंधित आरोपी कृष्णा राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप अल्लापूरकर यांनी तपास करीत न्यायालयात खटला दाखल केला.

जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायमूर्ती  के.एफ.एम. खान यांच्यासमोर सुनावणीत सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. या आधारे न्यायमूर्ती खान यांनी आरोपी राठोडला दोषी ठरवून दोन वर्ष करावासाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात मुख्य सरकारी अभियोक्ता ज्ञानोबा दराडे, सहाय्यक संचालक अ‍ॅड.सुहास कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅड.देवयानी सरदेशपांडे यांनी या प्रकरणात भक्कम बाजू मांडली.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या