25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeपरभणीसोशल डिस्टेन्सींगचा उडाला बोजवारा; परभणी बाजारपेठेत खरेदीसाठी उसळली नागरिकांची गर्दी

सोशल डिस्टेन्सींगचा उडाला बोजवारा; परभणी बाजारपेठेत खरेदीसाठी उसळली नागरिकांची गर्दी

एकमत ऑनलाईन

परभणी : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाने १५ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसा जिल्ह्यातील संपूर्ण बाजारपेठ बंद होती. परंतू जिल्हा प्रशासनाने १ ते 4 मे दरम्यान अत्यावश्यक सेवेकरीता सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सूट दिली. या पार्श्वभुमीवर सोमवारी दि.३ सकाळपासूनच बाजारपेठांमधून नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली होती. त्यामुळे सोशल डिस्टेन्सींगचा बोजवारा उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले.

वसमत रस्त्यावरील विद्यापीठ प्रवेशद्वार परीसरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला खरेदीसाठी गर्दी झाली होती. तसेच जिंतूर रस्त्यावरील अष्टविनायक मंदिर तसेच मध्यवस्तीतील अष्टभुजा चौक, गांधी पार्क, क्रांती चौक, गुजरी बाजार, शिवाजी चौक, ग्रँड कॉर्नर, साने चौक, जनता मार्केट, कच्ची बाजार, कापड बाजार, शिवाजी रोड आदी भागात हजारो नागरिक खरेदीत दंग होते. मध्यवस्तीत नागरिकांच्या उसळलेल्या या गर्दीने वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती.

प्रशासनाने या पुर्वी १५ दिवस बाजारपेठ बंदचे निर्बंध लादले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने किराणा दुकाने उघडण्यासाठी १ ते ४ दरम्यान केवळ ४ दिवसांची सवलत दिली आहे. या पार्श्वभुमीवर नागरिकांनी किराणा सामान भरण्यासाठी शहरातील बाजारपेठांमधून नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे शहरातील पोलिस यंत्रणेवर देखील ताण पहावयास मिळाला. बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने सोशल डिस्टेन्सींगचा देखील बोजवारा उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले.

परदेशातून येणा-या मदतीवर आयजीएसटी नाही; ३० जूनपर्यंत राहणार सूट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या