25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeपरभणीपरभणी जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा

परभणी जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा

एकमत ऑनलाईन

परभणी : जिल्ह्यात वादळी वा-यासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान शाखेने वर्तविली होती. परभणी शहरात रविवारी सकाळ पासून प्रचंड उष्णता जाणवत होती. दुपारी ४ वाजतानंतर सोसाट्याच्या वा-यासह विजांचा कडकडाटास सुरूवात होवून पावसास सुरूवात झाली. त्यामुळे शहरातील सखल भागात पावसाचे पाणी साचले होते.

परभणीतील वनामकृविच्या हवामान विभागाने दोन दिवसांपुर्वीच अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला होता. या अंदाजानुसार रविवारी दुपारनंतर परभणी शहरासह सोनपेठ, पालम व अन्य तालुक्यात अवकाळी पाऊस सुरू झाला. अवकाळी पावसाचा तडाखा बसल्याने अनेक शेतक-यांनी काढून शेतात ठेवलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. सोसाट्याच्या वा-यामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. एकंदरच आंबा विक्रीतून येणा-या चार पैशांनाही आता शेतक-यांना मुकावे लागणार असून शेतक-यांना नुकसान सोसावे लागणार आहे.

भारतातील नेत्यांच्या पुनावालांना धमक्या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या