16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeपरभणीवारकरी साहित्य परिषद वर्धापन दिनानिमित्त वारक-यांचा सत्कार

वारकरी साहित्य परिषद वर्धापन दिनानिमित्त वारक-यांचा सत्कार

एकमत ऑनलाईन

जिंतूर : वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र यांचा ११वा वर्धापन दिन सोहळा जिंतूर राम मंदिर मध्ये संपन्न झाला. अकराव्या वर्धापन दिनानिमित्त ह.भ.प रणधीर महाराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धेश्वर मंदिरापासून ते राम मंदिर पर्यंत दिंडी काढण्यात आली. या दिंडीत तालुक्यातील सर्व वारकरी उपस्थित होते. वारकरी साहित्य वर्धापन दिनानिमित्त सर्व वारक-यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उद्घाटक म्हणून माजी नगराध्यक्ष सचिन गोरे, अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष प्रतापराव देशमुख, प्रमुख पाहुणे श्री ह.भ.प. महेश चैतन्य महाराज गुरुकुल जिंतूूर, मैनापुरी संस्थाचे शिवपुरी महाराज, विठ्ठल महाराज जाधव आडगाव, ज्ञानेश्वर माऊली दाभाडे जिल्हाध्यक्ष वारकरी साहित्य परिषद परभणी, वारकरी साहित्य परिषदेचे तालुकाध्यक्ष ह.भ.प.रणधीर माऊली देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व वारक-यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच चिंतामणी महिला भजनी मंडळाचा सत्कार करण्यात आलाÞ सूत्रसंचालन श्री ह. भ. प. राजेंद्र महाराज घुगे यांनी केले. नगरसेवक विलास भंडारी यांचा सत्कार करण्यात आला. गणेश खवणे, मनोज साळवे, विशाल आव्हाड, माणिक खवणे, विश्वास तळेकर, सोमेश्वर सातपुते, श्रीराम मित्र मंडळ मित्र मंडळयांनी परिश्रम घेतले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या